नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यसभेसाठी रजनी पाटील यांची उमेदवारी निश्चित केली आहे. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी पोटनिवडणूक होणार आहे.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनी पाटील ( 5 डिसेंबर 1958) यांच्याकडे काँग्रेसचा जम्मू आणि काश्मीरचा प्रभार आहे. त्यांना राज्यसभेत कामगिरी केल्याबद्दल उत्तम संसदपटू हा पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी 1996 मध्ये बीडमधून लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला होता. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला आयोगाच्या 49 व्या परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्वही केले आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची 1992 मध्ये राजकारणात कारकीर्द सुरू केली.
हेही वाचा-२०२२ ला गोव्यात भाजपला मिळणार ऐतिहासिक विजय, फडणवीसांचा दावा
राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक आयोगाने यापूर्वीच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीचे मतदान व मतमोजणी एकाच दिवशी (4 ऑक्टोंबर)रोजी होणार आहे.
हेही वाचा-उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात मोठी ढगफुटी: 5 जण जखमी
काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे 16 मे 2021 रोजी पहाटेच्या सुमारास पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. सातव हे २३ एप्रिलपासून कोरोनाने संक्रमित होते.
हेही वाचा-पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांना पदावरून काढावे- राष्ट्रीय महिला आयोगाची सोनिया गांधींना विनंती
अभ्यासू युवा नेता म्हणून राजीव सातव यांची होती ओळख-
काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी कमी वयातच पक्षात फार मोठी जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे सातव हे अंत्यत हुशार अन् अभ्यासू खासदार म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. तसेच काँग्रेसचे सर्वेसर्वा असणारे राहुल गांधी यांच्या अतिशय जवळचे खासदार राजीव सातव होते. गुजरात राज्याची प्रभारी पदाची असलेली जबाबदारी देखील सातव यांनी उत्कृष्ट प्रकारे निभावली. सौरराष्ट्रातून दोन हात करून विधानसभेचे अठ्ठाविस उमेदवार विजयी करण्यासाठी सातव यांचा फार मोठा सिहांचा वाटा होता. सोबतच विविध समित्यांमध्ये व केंद्र शासनाच्याही समित्यात सातव यांनी काम पाहिलेले होते.