ETV Bharat / bharat

Goa Assembly election 2022 : काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; गुरुवारी भाजप करणार यादी जाहीर - गोवा विधानसभा निवडणूक

मागच्या दोन दिवसांपासून राज्यात भाजपला रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन टीम गोवा स्थापन करण्याचे ठरविलं होते. त्यात काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी अनुकूलता दर्शवत आपण तयार असल्याने सांगितले होते. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती आणि काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा अंतर्गत नेत्यांचा कलह पाहता राज्यात सध्यातरी भाजपला रोखण्यासाठी टीम गोवा स्थापन करणे ( Goa Congress Candidate List ) शक्य नसल्याचे बोलले जाते.

गोवा विधानसभा निवडणूक
गोवा विधानसभा निवडणूक
author img

By

Published : Jan 18, 2022, 3:18 PM IST

Updated : Jan 18, 2022, 6:42 PM IST

पणजी - गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी ( Goa Assembly Election 2022 ) सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली ( Candidate List For Goa Assembly Election ) आहे. काँग्रेसने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली ( Goa Congress Candidate List ) आहे.

काँग्रेसच्या यादीत नऊ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले आहेत. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री मायकेल लोबो यांना कलंगुटमधून तिकीट देण्यात आले आहे. पहिल्या दोन यादीत 15 तर आज 9 असे एकूण 24 उमेदवार काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले आहेत.

काँग्रेसच्या उमेदवारांची यादी
काँग्रेसच्या उमेदवारांची यादी

भाजपची पहिली यादी गुरुवारी होणार जाहीर-

भाजपची पहिली यादी गुरुवारी घोषित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि अन्य कोअर कमिटी मेंबर आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यांनंतरच यादीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
हेही वाचा-पी. चिदंबरम यांची गोवा काँग्रेसच्या वरिष्ठ निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

काँग्रेस अजूनही संभ्रमात

मागच्या दोन दिवसांपासून राज्यात भाजपला रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन टीम गोवा स्थापन करण्याचे ठरविलं होते. त्यात काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी अनुकूलता दर्शवत आपण तयार असल्याने सांगितले होते. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती आणि काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा अंतर्गत नेत्यांचा कलह पाहता राज्यात सध्यातरी भाजपला रोखण्यासाठी टीम गोवा स्थापन करणे शक्य नसल्याचे बोलले जाते. त्यातच काँग्रेस उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केल्याने अंतर्गत आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा-Goa Congress Candidate Second List : गोव्यात काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Last Updated : Jan 18, 2022, 6:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.