ETV Bharat / bharat

Khushbu Sundar Twitter : काँग्रेसकडून जुन्या ट्विटचा संदर्भ; तुम्ही इतके हताश का? खुशबू सुंदर यांचा पलटवार

author img

By

Published : Mar 25, 2023, 10:18 PM IST

Updated : Mar 25, 2023, 10:35 PM IST

भाजप नेत्या खुशबू सुंदर यांचे 2018 चे ट्विट पुन्हा व्हायरल होत आहे. खुशबू सुंदर म्हणाल्या होत्या की, 'मोदी सगळीकडे आहेत, पण येथे काय आहे? मोदी हे आडनाव भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. आता तेच ट्विट काँग्रेसने निशाणा साधला आहे. याबाबत खुशबू सुंदर यांनीही काँग्रेसला आव्हान दिले आहे.

Khushbu Sundar
Khushbu Sundar

बेंगळुरू (कर्नाटक) : भारतीय जनता पक्ष (भाजप) नेत्या खुशबू सुंदर यांनी शनिवारी काँग्रेसवर 'मोदी' नावाने केलेले जुने ट्विट सोशल मीडियावर अनेक वेळा पोस्ट केल्यानंतर काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. यावर विरोधी पक्ष किती हताश झाला आहे हे दर्शविते अशी प्रतिक्रिया दिली आहे. 2018 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या सुंदर यांनी केलेले ट्विट सोशल मीडियावर वारंवार पोस्ट केले जात आहे त्यावरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

2020 मध्ये काँग्रेस सोडली : हे केवळ ते (काँग्रेस पक्ष) किती हताश आहेत हेच दाखवत नाही तर ते मांडत असलेल्या मुद्द्याकडे त्यांचे अज्ञानही उघड करते असही त्या म्हण्ल्या आहेत. सध्या खुशबू भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. ज्यांनी 2020 मध्ये काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2018 मध्ये त्यांनी ट्विट केले होते, 'मोदींचा अर्थ भ्रष्टाचार असा बदलला पाहिजे... ते सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

जुन्या ट्विटचा मुद्दा : विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर आणि 'मोदी आडनाव'ची 'चोर'शी तुलना केल्याबद्दल लोकसभेसाठी अपात्र ठरल्यानंतर काँग्रेसने खुशबूच्या जुन्या ट्विटचा मुद्दा उपस्थित केला आहे. काँग्रेस नेते आणि राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरच्या माध्यमातून विचारले की, 'मोदीजी, तुमच्या एका शिष्यावर खुशबू सुंदर यांच्यावरही मानहानीचा खटला दाखल होईल का? आता ज्या भाजपची सदस्य आहेत. असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

ट्विट हटवणार नाही : खुशबू सुंदर म्हणाल्या, 'मी कधीही माझ्या टाइमलाइनवरून ट्विट हटवले नाही, आणि तसे करणारही नाही.' त्या म्हणाल्या, माझे नाव घेऊन काँग्रेसचे नेते काय करू पाहत आहेत? ते माझी तुलना राहुल गांधींशी करत आहेत का? असही त्या म्हणाल्या आहेत. 2018 मध्ये केलेल्या ट्विटवर स्पष्टीकरण देताना खुशबू म्हणाल्या, मी काँग्रेस पक्षात होते आणि फक्त काँग्रेस प्रवक्ता म्हणून कर्तव्य बजावत होते. हीच भाषा आम्हाला बोलायची होती आणि मी तेच करत होते असही त्या म्हणाल्या आहेत.

खुशबू यांचे काँग्रेसला आव्हान : 'मोदी' आडनावाचा अपमान करणे तुम्हाला चुकीचे वाटत नाही का? असे विचारले असता, त्या म्हणाल्या, 'राहुल गांधींनी सर्व मोदींना 'चोर' म्हटले, मी फक्त 'भ्रष्टाचार' म्हटले.' शब्द काँग्रेस पक्ष भेद करू शकत नाही, पण त्यांच्यात क्षमता असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, असे आव्हानही त्यांनी यावेळ दिले आहे. मी त्याला कायदेशीर मार्गाने सामोरे जाईन असही त्या म्हणाल्या आहेत.

कोण आहेत खुशबू सुंदर : खुशबू सुंदर एक अभिनेत्री आहेत. त्यांनी जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या प्रथम द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) या पक्षात मध्ये सामील झाल्या त्यानंतर त्या काँग्रसमध्ये होत्या. त्यानंतर त्यांनी 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या खुशबू भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य आहेत.

हेही वाचा : चीनच्या वांग लीनाचा पराभव करत भारताच्या स्वीटीने जिंकले सुवर्णपदक

Last Updated : Mar 25, 2023, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.