बर्मिंघम - राष्ट्रकुल स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतीय बॅडमिंटन संघाने (Indian Badminton Team) मिश्र सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. सुवर्ण पदकाच्या सामन्यात मलेशियाने भारताचा 3-1 असा पराभव करण्यात आला आहे. यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. भारतीय बॅडमिंटन संघाने जिंकलेल्या रौप्य पदकामुळे भारताची पदक संख्या 13 येऊन पोहचली आहे. पुरूष दुहेरीत मलेशियाने भारताला मात देत 1- 0 अशी आघाडी घेण्यात आली होती.
यानंतर पी व्ही सिंधूने (P.V. Sindhu) महिमला एकेरीचा सामना जिंकत 1- 1 अशी बरोबरी साधली आहे. मात्र, पुरूष एकेरीत किदंबी श्रीकांतला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. ( Commonwealth Games 2022 ) यामुळे मलेशियाने 1- 2 अशी आघाडी घेतली आहे. यानंतर महिला दुहेरीत बॅडमिंटन मिश्र सांघिक प्रकारात भारत आणि मलेशिया सुवर्ण पदकासाठी चांगलेच भिडले आहे.
पहिला सामना पुरूष दुहेरीचा झाला आहे. त्यामध्ये भारताच्या सात्विक रंकरेड्डी आणि चिराग शेट्टीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांना तेंग फाँग आणि वूई सोह या मलेशियन जोडीने 18-21, 15-21 असे पराभूत करण्यात आले आहे. मलेशियाने सध्या 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे.
मलेशिया विरूद्धच्या मिश्र सांघिक प्रकारात भारताने सुवर्ण पदकाच्या सामन्यात 1 - 1 अशी बरोबरी साधली होती. पुरूष दुहेरीचा सामना हरल्यानंतर भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला सिंगल्समध्ये जीन वे गोचा 22- 20, 21-17 असा पराभव करण्यात आला आहे.
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला सिंगल्समध्ये जीन वे गोचा 22- 20, 21-17 असा पराभव करण्यात आला होता. यामुळे भारताने सुवर्ण पदकाच्या सामन्यात मलेशियाशी 1- 1 अशी बरोबरी केली आहे. ( Commonwealth Games 2022 ) मात्र, पुरूष एकेरीत किदंबी श्रीकांत 21-19, 6-21, 21-16 असा पराभूत झाला आहे. यामुळे मलेशियाने पुन्हा मलेशियाने 2- 1 अशी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा - Attack on Uday Samant Vehicle : उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा कात्रज चौकात हल्ला, गाडीची तोडफोड