नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट - अंडर ग्रॅज्युएट (CUET-UG) परीक्षा घेते. शनिवारी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये तब्बल 22,000 पेक्षा जास्त उमेदवारांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत.
11.11 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली : विद्यार्थ्यांनी इंग्रज विषयात सर्वाधिक गुण मिळवले आहेत. त्यानंतर जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण पटकावले आहेत. प्रवेश परीक्षेच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी 11.11 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. या परीक्षेत 5,685 उमेदवारांनी इंग्रजीमध्ये 100 टक्के गुण मिळविले. तर 4,850 उमेदवारांनी जीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान/बायोकेमिस्ट्रीमध्ये पूर्ण पैकी पूर्ण गुण मिळवले. 2,836 उमेदवारांनी अर्थशास्त्रात 100 टक्के गुण मिळवले आहेत.
परसेंटाईल पद्धत वापरून मूल्यमापन केले : एनटीएच्या वरिष्ठ संचालक साधना पाराशर म्हणाल्या की, 'प्रत्येक उमेदवाराच्या कामगिरीचे मूल्यमापन समान परसेंटाईल पद्धत वापरून केले गेले आहे. याद्वारे एकाच विषयासाठी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गटाच्या टक्केवारीचा वापर करून प्रत्येक उमेदवाराच्या सामान्य गुणांची गणना केली गेली आहे'. अर्जदारांच्या संख्येच्या बाबतीत CUET-UG ही देशातील दुसरी सर्वात मोठी प्रवेश परीक्षा आहे.
CUET UG निकाल 2023 कसा डाउनलोड करायचा? : उमेदवार त्यांचे CUET UG स्कोअरकार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी खाली नमूद केलेल्या स्टेप्सचे अनुसरण करू शकतात. तसेच अधिकृत पोर्टलच्या लॉगिन विंडोवर थेट जाण्यासाठी खाली दिलेल्या थेट लिंकवर देखील क्लिक करू शकतात.
- cuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर, CUET UG 2023 च्या निकालांसाठी उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करा.
- स्क्रीनवर एक नवीन विंडो दिसेल. तुमचे लॉगिन तपशील प्रविष्ट करा.
- सबमिट केल्यानंतर तुमचे CUET UG 2023 स्कोअरकार्ड स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
- ते डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याचे प्रिंटआउट घ्या.
हे ही वाचा :
- Jammu Kashmir : घरात कोणीच नव्हते डॉक्टर; जम्मू काश्मीरच्या तीन बहिणींनी नीटमध्ये फडकावला झेंडा
- MPSC Exam Result 2023 : चप्पल-जोडे शिवणाऱ्यांची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक; शिकवणी न लावता एमपीएससी उत्तीर्ण
- SSC Result 2023 : 59 वर्षाच्या आज्जी झाल्या दहावी उत्तीर्ण; तब्बल 40 वर्षानंतर घेतले पुस्तके हातात