नवी दिल्ली - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्याची भीती असताना दिलासा देणारी बातमी आहे. कोरोना लस 18 वर्षाखालील मुलांना देण्याकरिता वैद्यकीय चाचण्या सुरू असून अंतिम टप्प्यात आहेत. या चाचण्या लवकरच पूर्ण होणार असल्याचे माहिती केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दिली.
लहान मुलांकरिता लस देण्याकरिता केंद्र सरकार धोरण तयार करणार आहे. तज्ज्ञांनी सल्ला दिल्यानंतर लहान मुलांना कोरोना लस दिली जाणार असल्याचे केंद्र सरकारच्यावतीने वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले.
हेही वाचा-खर्च 127 कोटी, 200 रोबो; पाहा अहमदाबादमधील रोबोटिक्स गॅलरी
लसीकरणाच्या चाचण्या पूर्ण होऊ द्या-
दिल्ली उच्च न्यायालयातील पीठाचे मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी सुनावणी दरम्यान निरीक्षणे नोंदविले. त्यांनी म्हटले, की चाचण्या पूर्ण होऊ द्या. अन्यथा लहान मुलांना लस दिल्यास मोठे संकट निर्माण होऊ शकते.
लसीकरणाबाबत संशोधन केले नाही तर धोका
कोरोना लशीच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मुलांना त्वरित लस द्यावी. संपूर्ण देश लसीकरणाची वाट पाहत आहे. कोरोना लशीची चाचणी सुरू असताना लसीकरणाची टाईमलाईन देणे शक्य नाही. लसीकरणाबाबत संशोधन केले नाही तर धोका होऊ शकतो, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
हेही वाचा-प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये करणार प्रवेश...राजस्थानच्या महसूल मंत्र्यांचे स्पष्ट संकेत
कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती असताना 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांचे त्वरित लसीकरण करावे, अशी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील पुढील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालय 6 सप्टेंबरला घेणार आहे.
मुंबईत ट्रायलमध्ये लहान मुलांना झायकॉडी लस-
मुंबईत कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. येत्या महिनाभरात तिसरी लाट येणार असून त्यात लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील लहान मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी १२ ते १८ वयोगटातील मुलांचे नायर रुग्णालयात ट्रायल लसीकरण केले जाणार आहे. ‘झायडस कॅडिला’ कंपनीने लसीकरणासाठी तयारी दर्शवली आहे. या ‘ट्रायल’मध्ये ५० मुलांना ‘झायकॉडी’ लस देण्यात येणार आहे.