ETV Bharat / bharat

CIA-style: खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येबाबत अमेरिकन गुप्तचर संस्थांनी कॅनडाला दिली माहिती - Hardeep Singh Nijjar

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येसाठी कॅनडानं भारताला जबाबदार धरण्याची माहिती अमेरिकन एजन्सींनी दिली. ब्रिटिश कोलंबियातील शीख मंदिराबाहेर 18 जून रोजी निज्जरच्या हत्येनंतर, अमेरिकन गुप्तचर संस्थांनी त्यांच्या कॅनेडियन समकक्षांना यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळं कॅनडानं यात भारताचा सहभाग असल्याचा निष्कर्ष काढला.

CIA-style
CIA-style
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 6:55 PM IST

Updated : Sep 24, 2023, 10:45 PM IST

नवी दिल्ली : भारत, कॅनडा यांच्यातील राजनैतिक, आर्थिक तणावादरम्यान अमेरिकेतील एका वृत्तपत्रानं मोठा खुलासा केला आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कॅनडाच्या सरकारनं भारत सरकारवर गंभीर आरोप केल्याचं म्हटलंय. खलिस्तानी नेता हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी कॅनडाच्या सरकारला याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. कॅनडानं सरकारनं निज्जरच्या हत्येत भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला होता. 18 जून रोजी ब्रिटिश कोलंबियातील शीख मंदिराबाहेर निज्जरची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकन गुप्तहेर संस्थांनी या हत्येबाबत काही पुरावे त्यांच्या कॅनेडा सरकारला सादर केले होते. कॅनडा सरकारनं या घटनेमागे भारत सरकारचा हात असल्याचा निष्कर्ष काढला होता.

भारतावर गंभीर आरोप : या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी असलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं वृत्तपत्रानं म्हटलं आहे की, अमेरिकन गुप्तचर संस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर कॅनडाच्या सरकारनं या प्रकरणाची अधिक चौकशी केली. तपासानंतर, कॅनडाच्या गुप्तचर संस्थेनं आणखी ठोस पुरावे गोळा केले. ज्यावरून यामागे कोणाचा हात आहे याचा स्पष्ट निष्कर्ष काढता येईल. मात्र, वृत्तपत्रानं त्या अधिकाऱ्यांची ओळख उघड केलेली नाही. हे अधिकारी अमेरिकन गुप्तचर विभागाशी संबंधित आहेत की कॅनडाच्या सरकारशी हे देखील स्पष्ट केले गेले नाही. हा अहवाल कॅनडातील अमेरिकेचे राजदूत डेव्हिड कोहेन यांनी केलेल्या दाव्याशी जुळतो. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर केलेले आरोप 'फाइव्ह आयज पार्टनर्सद्वारा केले आहेत. फाइव्ह आयज इंटेलिजन्स शेअरिंग नेटवर्कमध्ये यूएस, यूके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचं यांचा समावेश आहे. याची स्थापना 1946 मध्ये करण्यात आली होती.

  • मित्र राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, निज्जरची हत्या होईपर्यंत अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनाही याबाबत कल्पना नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेला या कटाची किंवा त्यात भारताच्या सहभागाशी संबंधित पुरावे माहीत नव्हते. अधिकार्‍यांनी सांगितले की, जर अमेरिकन अधिकार्‍यांना पूर्व माहिती असती, तर त्यांनी कॅनडाच्या सरकारच्या गुप्तचर संस्थांच्या लगेच कळवलं असतं.

हेही वाचा -

  1. India Canada Relations : भारत-कॅनडा संघर्षाचा कृषी संसाधनांवर परिणाम? वाचा सविस्तर
  2. Canada Visa Service Suspend : भारत सरकारचा कॅनडाला झटका; कॅनडाची व्हिसा सेवा स्थगित
  3. Hardeep Singh Nijjar : प्लंबर ते कुख्यात खलिस्तानवादी; कोण आहे हरदीपसिंग निज्जर?

Last Updated : Sep 24, 2023, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.