ETV Bharat / bharat

तब्बल नऊ महिन्यानंतर भारत चीन सीमेवरील तणाव निवळण्यास सुरुवात - भारत चीन सैन्यातील तणाव निवळला

मागील ९ महिन्यांपासून दोन्ही देशांत सीमासंर्घषामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता हा तणाव निवळण्यास सुरूवात झाली आहे. एकसाथ आणि नियोजितपणे भारत आणि चीनचे सैन्य सीमेवरून माघारी जात असल्याचे चिनी लष्कारने जाहीर केले आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 11, 2021, 8:27 AM IST

नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवरच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरून चीन आणि भारताच्या सैन्याने माघारी जाण्यास सुरूवात केली आहे. मागील ९ महिन्यांपासून दोन्ही देशांत सीमासंर्घषामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता हा तणाव निवळण्यास सुरूवात झाली आहे. एकसाथ आणि नियोजितपणे भारत आणि चीनचे सैन्य सीमेवरून माघारी जात असल्याचे चिनी लष्कारने जाहीर केले आहे.

लष्कराच्या नवव्या चर्चेनंतर निर्णय -

२४ जानेवारीला लष्कराच्या कमांडर स्तरावरील बैठकीतील एकमतानुसार सैन्य माघारी घेण्यात येत आहेत. ही चर्चेची नववी फेरी होती. याआधीच्या आठ बैठका निष्फळ ठरल्या होत्या. त्यामुळे तोडगा निघण्याची आशा धुसर होती. मात्र, आता सैन्य माघारी घेण्यावर एकमत होताना दिसून येत आहे. दोन्ही देशांचे सैन्य युद्धाच्या तयारीत सीमेवर तैनात असून रणगाडे, दारुगोळा, अतिरिक्त सैन्य, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, सरदीसह इतर सामान सीमेवर आणि जवळच्या परिसरात तयार ठेवले होते. मात्र, आता टप्प्याटप्याने हे सर्व सामान माघारी घेण्यात येत आहे.

भारताची अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी -

भारतीय लष्कराने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत याबाबत वक्तव्य करतील असे संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाने सांगितले. मंगळवारी आणि बुधवारी भारतीय आणि चिनी सैन्याच्या कमांडरने एकत्र येत मागे हटण्याच्या तयारीवर चर्चा केल्याचीही माहिती समोर येत आहे. टप्प्याटप्याने सीमेवरील सैन्य मागे घेण्यात येईल, बैठकीत असे ठरल्याचे लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. चीनच्या बाजूने माघारी फिरण्याची तयारी सुरू झाली असून त्या दृष्टीने हालचाली दिसून आल्या आहेत. भारतीय लष्कर सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मागे हटण्याच्या प्रक्रियेत जाणार वेळ -

संपूर्णपणे मागे हटण्याच्या प्रक्रियेस सुमारे एक आठवडा ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात भारत आणि चीनच्या सैन्यात गलवान खोऱ्यात धुमश्चक्री झाली होती. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. गलवान खोरे, पँगाँग सरोवर आणि आजूबाजूच्या परिसरात चीनने भारतीय हद्दीत अतिक्रम केले होते. तसेच तेथे डेरा मांडला होता. भारतानेही चीनचा सामना करण्यासाठी काही संवेदनशील ठिकाणी सैन्य तैनात केले होते. त्यास चीनचा आक्षेप होता. तब्बल ९ महिन्यानंतर हा वाद मिटताना दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.