ETV Bharat / bharat

Jhulelal Jayanti 2023 : का साजरी करण्यात येते भगवान झुलेलाल जयंती; कोण होते भगवान झुलेलाल

भगवान झुलेलाल यांची जयंती देशभरात २२ मार्चला साजरी करण्यात येते. या दिवशी सिंधी बांधव मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करतात.

author img

By

Published : Mar 21, 2023, 5:30 PM IST

Jhulelal Jayanti 2023
संग्रहित छायाचित्र

हैदराबाद : देशभरात २२ मार्चला भगवान झुलेलाल यांची जयंती साजरी करण्यात येते. या दिवशी सिंधी बांधव झुलेलाल यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करताना दिसतात. त्यामुळे जाणून घेऊया कोण होते भगवान झुलेलाल, का त्यांची जयंती करण्यात येते साजरी, चेटीनाड उत्सव कशाला म्हणतात, या सगळ्याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत.

काय आहे इतिहास : सिंधवर पूर्वी हिंदू राजाचे राज्य होते. राजा धरार हा शेवटचा हिंदू राजा होता. त्याचा मोहम्मद बिन कासिमकडून पराभव झाला. यानंतर मुस्लिम राजा सिंधच्या गादीवर बसला. 10 व्या शतकाच्या उत्तरार्धात सिंधच्या 'थट्टा' येथे मकरब खान राजा होता. त्याला शाह सदाकत खानने मारले आणि स्वतःचे नाव मिरक शाह असे ठेवले. मिरकशाहाने हिंदूंवर अत्याचार सुरू केल्याचे नागरिकांमध्ये संताप उसळला. सर्व हिंदूंना इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल, अन्यथा त्यांना मारले जाईल असा फतवा त्याने काढला. त्यामुळे सगळे नागरिक सिंध नदीच्या काठावर जमले आणि त्यांनी प्रार्थना केली. त्यावेळी भगवान वरुण यांनी त्यांचा जन्म नसरपूर येथे देवकी आणि ताराचंद यांच्या पोटी होईल अशी भविष्यवाणी केल्याची अख्यायीका सांगितली जाते. देवकी आणि ताराचंद यांच्या पोटी जन्मलेले मूल या नागरिकांचा संरक्षक होईल असेही यावेळी सांगण्यात आले.

मिरक शाहचा मृत्यू : नागरिकांना झालेल्या आकाशवाणीच्या 2 दिवसानंतर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात नसरपूर (पाकिस्तानात असलेले सिंधू खोरे ) येथील देवकी आणि ताराचंद यांना मुलगा झाला. भविष्यात मीराकशाह सारख्या शैतानाला संपवणाऱ्या हिंदू सिंधी समाजाचा हा लहान मुलगा तारणहार ठरला. आपल्या नावाचे वैशिष्ट्य करून उदयचंद यांनी सिंधमधील हिंदूंच्या जीवनातील अंधार दूर केला. जन्मानंतर जेव्हा त्याच्या पालकांनी त्याच्या तोंडात संपूर्ण सिंधू नदी पाहिली. या नदीत त्यांना एक एक मोठा मासा पोहत होता, म्हणूनच झुलेलालला पाले वारो असेही म्हणतात.

कसे आहेत भगवान झुलेलाल : भगवान झुलेलाल यांना पांढर्‍या मिशा आणि दाढीने चित्रित केले आहे. त्यांनी शाही पोशाख आणि मोराच्या पिसांनी सजलेला मुकुट परिधान केलेला दिसतो. सिंधू नदीवर पोहणाऱ्या माशाच्या पाठीवर कमळावर बसलेल्या झुलेलालच्या हातात पवित्र ग्रंथ आणि जपमाळ आहे.

झुलेलाल जंयतीनिमित्त उत्सव : भगवान झुलेलाल यांच्या जयंतीच्या उत्सवालाच चेटीचंद उत्सव म्हणून संबोधले जाते. त्यामुळे भगवान झुलेलाल यांची जयंती देशभरात चेटीचंद उत्सव म्हणूनही साजरी करण्यात येते. भगवान झुलेलाल यांच्या या जयंतीदिनी आपणा सर्वांना पुढच्या वर्षाची चांगली सुरुवात होवो. भगवान झुलेलाल तुम्हाला आणि घरातील इतर सर्वांना उत्तम आरोग्य, संपत्ती, शांती, आनंद आणि समृद्धी देवो.

हेही वाचा - World Forest Day 2023 : वृक्षवल्ली आम्हा सोयरे, पण तरी होते दरवर्षी 'इतक्या' वृक्षाची कत्तल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.