ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली आयुषमंत्री नाईक यांची भेट - गोवा मंत्री रामदास आठवले बातमी

केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले शुक्रवार पासून गोवा दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी वास्को येथे तर आज सकाळी पणजी येथे संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेत चर्चा केली. त्यानंतर दुपारी गोमेकॉत जाऊन नाईक यांची भेट घेऊन चौकशी केली.

central minister ramdas athavale meet shripad naik in hospital at panji
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली आयुषमंत्री नाईक यांची भेट
author img

By

Published : Feb 13, 2021, 3:24 PM IST

Updated : Feb 13, 2021, 4:14 PM IST

पणजी - महिनाभरापूर्वी कर्नाटकात एका रस्ता अपघातात जखमी झालेले केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज दुपारी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांची गोमेकॉत जाऊन भेट घेत चौकशी केली.

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली आयुषमंत्री नाईक यांची भेट

रामदास आठवलेंचा दौरा

आठवले शुक्रवार पासून गोवा दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी वास्को येथे तर आज सकाळी पणजी येथे संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेत चर्चा केली. त्यानंतर दुपारी गोमेकॉत जाऊन नाईक यांची भेट घेऊन चौकशी केली.

असा झाला होता अपघात

11 जानेवारी 2021 रोजी कारवार जिल्ह्यातील अंकोला नजीक एका रस्ता अपघातात नाईक जखमी झाले होते. त्यांच्यावर तेथे प्राथमिक उपचार करून गोमेकॉत आणण्यात येऊन उपचार करण्यात आले. त्यांनंतर शस्रक्रिया करण्यात आल्या. प्रथम आयसीयू आणि आता एका विशेष कक्षात नाईक यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्य तब्बेतीमध्ये सुधारणा होत आहे. आठवड भरापूर्वी त्यांना रुग्णालय परिसरातील मोकळ्या हवेत व्हिल चेअरवरून फिरविण्यात आले होते.
दरम्यान, या अपघातात नाईक यांची पत्नी आणि एक खासगी सचिव यांना प्राण गमवावे लागले.

Last Updated : Feb 13, 2021, 4:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.