नवी दिल्ली - बुली बाई अॅपमुळे (Bulli Bai App) वादंग निर्माण झाले आहे. आता या प्रकरणात नवा टि्वस्ट आला आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी तीघांना अटक केली आहे. यात दोन तरुण आणि एका तरुणी श्वेता सिंहचा समावेश आहे. मुख्य आरोपी म्हणून मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या उत्तराखंडमधल्या श्वेता सिंहची धाकटी बहिण माध्यमांसमोर आली आहे. आपली बहिण कोणतीही मास्टरमाईंड नसून ती दोषी असल्याचे तीने म्हटलं.
श्वेता सिंह ही 'जट खालसा 7' हे ट्विटर अकांऊट चालवत होती. तर हे जट खालसा या नावाने हे अकांउट का सुरू करण्यात आले आहे, याचा तपास मुंबई पोलीस करत आहे. श्वेता सिंहचे उत्तराखंड पोलिसांकडून ट्रान्झिट रिमांड घेत तीला मुंबईला आणण्यात आले आहे. श्वेता सिंहच्या अटकेनंतर तीच्या बहिणीने माध्यमांशी संवाद साधला. आपल्या आईचा 2011 मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला आणि गेल्या वर्षी त्याच्या वडिलांचेही कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ज्यातून आमचे कुटुंब अद्याप सावरलेले नाही. त्यामुळे आमच्यावर आधीच वाईट परिस्थिती असून आता आणखी एक संकट आलं आहे, असे ती म्हणाली.
आपल्या बहिणीला या प्रकरणात फसवण्यात येत असून तीने असे काहीच केले नसल्याचेही तीने म्हटलं. गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे वडिलांना गमावले आहे. तेव्हापासून श्वेता डिप्रेशनमध्ये होती. तिचा जास्तीत जास्त वेळ मोबाईलमध्ये घालवायची. पण हे सगळं होईल, हे तिला कळतही नव्हतं, असेही तिने सांगितले. तसेच तिला अटक करण्यात आली. तेव्हा श्वेताजवळ एक रुपयाही नव्हता,असेही तीने सांगितले.
श्वेता सिंह आहे तरी कोण?
श्वेता सिंग ही 18 वर्षीय तरुणी उत्तराखंडची रहिवासी असून 12 वी पास आहे. सोशल मीडियावर मुस्लीम महिलांना बदनाम करण्याचे काम केल्याने मुंबई पोलिसांनी श्वेता सिंहला उधमसिंह नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून तिची चौकशी सुरू आहे. श्वेताच्या आई आणि वडिल दोघांचे निधन झाले आहे. तीन बहिणी आणि एक भाऊ, असे तीचे कुटुंब असून ते आर्थिक संकटात सापडले आहे. तिच्या मनात मुस्लिमांबद्दल इतका द्वेष का निर्माण झाला, की तिने पैशांसाठी हे काम केले याचा तपास पोलीस करत आहेत. उत्तराखंडमधून ताब्यात घेतलेल्या श्वेताला मुंबईत आणलं आहे.
काय आहे बुली बाई अॅप?
बुली बाई ( Bulli Bai App ) या अॅपवर हजारो मुस्लिम महिलांचा लिलाव केला जात होता. कथितपणे मुस्लिम महिलांना टार्गेट केले जात होते. बुली बाई अॅप मुस्लिम महिलांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन त्यांचे फोटो डाऊनलोड करुन लिलावासाठी पोस्ट असल्याचा आरोप आहे. अॅपची माहिती समोर येताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उद्रेक पहायला मिळाला. या अॅपमुळे मुस्लिमांमध्ये संतापाचं वातावरण आहे.