ETV Bharat / bharat

Bjp Big Wins In RS Polls : भाजपचा राज्यसभेत मोठा विजय, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला दिला जोरदार धक्का - राजस्थान भाजप

राज्यातील राज्यसभेच्या ( Rajya Sabha ) सहापैकी तीन जागा भाजपने ( BJP ) जिंकल्याने महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला मोठा धक्का बसला आहे. चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी आपले राजकीय कौशल्य पणाला लावत बाजी मारली आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीत भाजपाने कर्नाटक ( Karanataka BJP ), हरियाणा ( Hariyana ) , महाराष्ट्रात आपला अधिकचा एक उमेदवार निवडून आणत आपल्या विरोधकांना जोरदार धक्का दिला. अटीतटीच्या लढतीत विजय मिळविला.

Sansad Bhavan
संसद भवन
author img

By

Published : Jun 11, 2022, 10:18 AM IST

Updated : Jun 11, 2022, 10:55 AM IST

मुंबई/चंदीगड/बेंगळुरू/जयपूर : राज्यसभा निवडणूक ( Rajya Sabha ) केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि पियुष गोयल, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला आणि जयराम रमेश आणि शिवसेनेचे संजय राऊत हे उमेदवार सहज त्यांना आवश्यक असलेली मते मिळवून सहज निवडून आले. चार राज्यांमध्ये 16 जागांसाठी मतदान झाले होते. क्रॉस व्होटिंग आणि नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी सत्तारुढ आणि विरोधकांकडूनही झाल्याने महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये ( Hariyana ) मतमोजणीला तब्बल आठ तास उशीर झाला.

भाजपचे दोन उमेदवार आणि भाजप पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार अशा तिघांचा विजय या निवडणुकीत लक्षवेधी ठरला. महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई होती. शिवसेनेच्या संजय पवार यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. तर भाजपने धनंजय महाडिक यांना या लढतीत उभे केले होते. मध्यरात्री उशीरा झालेल्या मतमोजणीत धनंजय महाडिक यांनी संजय पवार यांना पराभूत केल्याचे स्पष्ट झाले. या पराभवामुळे महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. महाराष्ट्रातून भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्यातले माजी मंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी हे विजयी झाले आहेत.

महाराष्ट्रातील या विजयाचे शिल्पकार भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर ट्विट केले की, निवडणुका या फक्त लढण्यासाठी नाहीत तर जिंकण्यासाठी असतात. हरियाणामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला जेथे भाजपचे कृष्णलाल पनवार आणि भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी विजय मिळविला. तर काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांचा पराभव झाला. पनवर यांना 36 मते मिळाली तर शर्मा यांना पहिल्या पसंतीची 23 मते मिळाली. दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे त्यांचा विजय नोंदविला गेला.

कर्नाटकमध्येही भाजपने जोरदार विजय मिळवित तीन जागांवर विजय मिळविला. कर्नाटकातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली. जनता दल (एस) च्या वाटेला एकही जागा आली नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अभिनेते-राजकारणी जगेश आणि भाजपचे एमएलसी लहरसिंग सिरोया आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांचा कर्नाटकातून विजय झाला.

भाजपच्या सिरोया यांनी काँग्रेसच्या मन्सूर अली खान आणि डी कुपेंद्र रेड्डी (जेडीएस) यांच्यावर विजय मिळवला, प्रतिस्पर्धी पक्षांकडून क्रॉस व्होटिंग आणि अपक्षांच्या मदतीमुळे स्पष्टपणे मदत झाली. राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसने चारपैकी तीन तर भाजपने एक जागा जिंकली.भाजप-समर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा पराभूत झाले. गेल्यावेळी हरियाणातून लढलेले चंद्रा यांनी यावेळी राजस्थानमधून नशीब आजमावले होते.

काँग्रेसचे उमेदवार रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी हे निवडून आले आणि भाजपचे घनश्याम तिवारी हेही निवडून आले. एका चुरशीच्या लढाईत भाजप आमदार शोभाराणी कुशवाह यांनी काँग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी यांच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केले. भाजपने त्यांना तातडीने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले आहे.

हेही वाचा - फडणवीसांच्या व्यूहरचनेपुढे महाविकास आघाडी सपशेल फेल, धनंजय महाडिक विजयी

Last Updated : Jun 11, 2022, 10:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.