श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती Mehbooba Mufti यांनी सोमवारी त्यांच्या ट्विटर हँडलवर दक्षिण काश्मीरमधील कुलगाममधील एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा एक गट हिंदू भजन 'रघुपती राघव राजा राम' गाताना दिसत आहे. BJP now enforcing its agenda यावर भाष्य करताना मेहबुबा म्हणाल्या, "भाजप आता काश्मीरमधील शाळांमधून आपला अजेंडा राबवत Kashmir schools Forcing students आहे. विद्यार्थ्यांना हिंदू भजन म्हणण्यास भाग पाडले जात Forcing students to chant Hindu hymns आहे.
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, 'येथे प्रत्येक धर्माचे लोक राहतात. आमच्याकडे संविधान आहे. हिंदू असो वा मुस्लिम, शीख असो वा ख्रिश्चन, प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. जम्मू-काश्मीर मुस्लीम बहुसंख्य असूनही भारतासोबतच राहिले, या विचाराने आपली ओळख इथेच राहील, विविध धर्माचे लोक आहेत, त्यांना पूर्ण संरक्षण मिळेल.
पण दुर्दैव आहे की, आमच्याकडून ओळख हिरावून घेतली गेली आहे, आमच्या जमिनीचं काय होतंय, आमच्या नोकऱ्यांचं काय होतंय, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. पण आता हे लोक आपल्या धर्मावर आले आहेत. 2019 पासून जामिया मशिदीला कुलूप आहे. आमच्या शाळेतील मुस्लीम मुलांना भजने गाण्यास सांगितले जाते. मला वाटतं ते आता थेट आपल्या धर्मावरच आघात करत आहेत. त्यांचा वेगवान हिंदुत्व असलेल्या भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा जम्मू-काश्मीरमध्ये प्रयोगशाळा बनवून आजमावायचा आहे, असे दिसते. हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्याला परवानगी दिली जाणार नाही.