कूचबिहार (पश्चिम बंगाल): पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये एक विवादित प्रकरण समोर आले आहे. जिथे तृणमूल काँग्रेसचे वादग्रस्त नेते आणि कूचबिहार नगरपालिकेचे अध्यक्ष रवींद्रनाथ घोष (President Rabindranath Ghosh) यांनी बिर्याणी (biryani reduces sex power ) खाल्याने पुरुषांचा सेक्स पावर (Biryani and sex power) कमी होत असल्याचा दावा करत थेट बिर्यांनीचे दुकानच बंद (Trinamool leader closes biryani shop) पाडले. (Latest news from West Bengal) (biryani reduces sex power)
आरोपामागे पुरावा काय ? या विचित्र आरोपामागे कोणताही शास्त्रीय पुरावा नव्हता. ममता बॅनर्जी सरकारमधील उत्तर बंगाल विकास मधील माजी मंत्री म्हणाल्या की, वेगवेगळ्या स्तरातून असे आरोप केले जात आहेत की, बिर्यानी बनविण्यासाठी वापरल्या जाणारे पदार्थ आणि मसाल्यांमुळे मर्दानीपणा कमी होतो. म्हणूनच आम्ही बिर्यानी विक्रीचे दुकानच बंद केले आहे. (Biriyani reduces virility)
टीएमसी नेते बिर्याणीचे दुकान हटविणार : पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कूचबिहार महापालिका क्षेत्रात अनेक बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या दुकानांमधून असले मसाले वापरल्या जाण्याचा आरोप लावण्यात आला आहे. यात श्रेणीत 'कोलकाता बिर्याणी' नावाच्या दुकानावर पुरुषांच्या लैंगिक इच्छेसाठी हानिकारक असे पदार्थ वापरण्यात आल्याचा आरोप झाला. म्हणून, आम्ही येऊन दुकान बंद केले. घोष म्हणाले की नागरी संस्थेने हा निष्कर्ष कोठून काढला हे सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले.
बिर्याणी विक्रेत्यांची संपूर्ण माहिती काढण्याचा आदेश : घोष म्हणाले की, उत्तर प्रदेश आणि बिहारचे बिर्याणी विक्रेते रस्त्यांवर अतिक्रमण करत आहेत. ते रस्त्याच्या कडेला अन्न शिजवतात. हे दुकानदार रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडी ठेवतात जेथून समाजविघातक कृत्य केले जातात. या बिर्यानी विक्रेत्यांकडे कोणताही व्यवसाय परवाना नाही आणि ते केवळ अल्प कालावधीसाठी व्यवसाय करतात. हे बिर्याणी विक्रेते कोण लोक आहेत आणि ते कुठून आले आहेत. याचा शोध घेण्यासाठी टीएमसी नेत्यांनी पोलिसांनाही कळवले आहे. योग्य व्यवसाय परवाना आणि खाद्य परवाना घेऊन व्यवसाय करायचा असल्यास नागरी संस्थेला कोणतीही अडचण नाही, असे आश्वासन पालिकेने दिले. तथापि, केवळ एक दुकान का लक्ष्य केले गेले हे अधिका-यांनी स्पष्ट केलेले नाही.