ETV Bharat / bharat

Lata Mangeshkar Music College : इंदूरमध्ये लता दीदींचा पुतळा आणि संगीत महाविद्यालय-संग्रहालय उभारणार - मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान - लता दीदींच्या स्मरणार्थ

इंदूरमध्ये लता दीदींच्या स्मरणार्थ (In memory of Lata Didi) इंदूरमध्ये लता दीदींचा पुतळा उभारला जाणार आहे. तसेच संगीत महाविद्यालय-संग्रहालय (Lata Mangeshkar Music College) उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar
author img

By

Published : Feb 7, 2022, 11:18 AM IST

भोपाळ - मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिवंगत स्वर कोकिळा लता मंगेशकर (Swar Kokila Lata Mangeshkar) यांच्याशी संबंधित आठवणींचा उल्लेख करणारा ब्लॉग लिहिला. ज्यामध्ये त्यांनी लिहिले - लता दीदींचे निधन हे जागतिक संगीत जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्याचबरोबर त्यांचे वैयक्तिक नुकसान देखील आहे. शिवराज यांनी पुढे लिहिले की, 2017 मध्ये त्यांनी नर्मदा सेवा यात्रा (Narmada Seva Yatra) आणि पर्यावरण रक्षणासाठी लोकांना संदेश देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी नर्मदा सेवा यात्रेबाबत सुमारे 20 मिनिटे फोनवर बोलून सविस्तर माहिती घेतल्यानंतर केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले होते.

  • MP CM SS Chouhan plants saplings in memory of singing legend #LataMangeshkar in Bhopal

    "Lata Ji was born in Indore &so a music academy,music university, museum& a statue will be established in Indore. A Lata Mangeshkar award to be given on her birth anniversary annually,"he said pic.twitter.com/Uaf59F2lVW

    — ANI (@ANI) February 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लतादीदी एमपी-नर्मदा नदीबद्दल भावूक झाल्या होत्या-

मुख्यमंत्री शिवराज यांनी ब्लॉग लिहून लताजींच्या आठवणींना उजाळा दिला

संवादादरम्यान लता मंगेशकर म्हणाल्या की, मला नर्मदा यात्रेत सहभागी होण्याची खूप इच्छा आहे. परंतु माझी तब्येत मला तसे करण्यास परवानगी देत ​​नाही. लतादीदींनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि आई नर्मदेची सेवा करण्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले होते. मुख्यमंत्र्यांनी ब्लॉगमध्ये (Chief Minister Shivraj Singh Chouhan) पुढे लिहिले की, त्यांच्या बोलण्यात आणि शब्दात जो आपलेपणा आणि आपुलकी होती, ती मी कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या आत्मीयतेची ती भावना त्यांच्यासाठी अमूल्य ठेवा आहे.

इंदूरमध्ये लता संगीत संग्रहालय-कॉलेज उभारणार, पुतळा बसवणार -

लताजींच्या स्मरणार्थ मुख्यमंत्र्यांनी वृक्षारोपन केले

लता दीदी या मध्य प्रदेशच्या कन्या होत्या. मध्य प्रदेश ही त्यांची कर्मभूमी नसली तरी सुद्धा त्यांचे हृदय मध्य प्रदेशसाठी नेहमीच धडधडत होते. इंदूरमध्ये लताजींच्या नावाने संगीत अकादमी, संगीत महाविद्यालय, संगीत संग्रहालय आणि लताजींच्या पुतळ्याची स्थापना करण्यात (A statue of Lata Didi erected) येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.