ETV Bharat / bharat

‘मोदींना मत दिलंत ना, मग कामाचं पण त्यांनाच विचारा,’ मुख्यमंत्री कुमारस्वामी आंदोलकांवर भडकले - cm kumaraswamy

या प्रकारावरून मोदी लाटेत पराभव झाल्यामुळे इतर पक्षांच्या नेत्यांना नैराश्याने ग्रासल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते मोदींना मते दिल्याच्या रागातून लोकांवरच संताप व्यक्त करत आहेत.

मुख्यमंत्री कुमारस्वामी
author img

By

Published : Jun 26, 2019, 10:22 PM IST

बंगळुरु - रोजगाराबाबत जाब विचारणाऱ्या आंदोलकांना कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी अजब उत्तर दिले आहे. त्यांच्या या उत्तराने आंदोलकांसह त्यांचे समर्थकही अवाक् झाले. येरमारुस थर्मल पॉवर स्टेशनचे कर्मचारी मुख्यमंत्र्यांविरोधात वेतन आणि इतर प्रश्नांसंदर्भात आंदोलन करीत होते. भडकलेल्या कुमारस्वामींनी त्यांना आपले प्रश्न घेऊन चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारण्यास सांगितले.

मुख्यमंत्री कुमारस्वामी बसने कारेगुड्डा गावाकडे एका निवासी कार्यक्रमासाठी निघाले होते. दरम्यान त्यांची बस रायचूर येथे पोहोचल्यानंतर तेथे येरमारुस थर्मल पॉवर स्टेशनच्या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि घोषणाबाजीला सुरुवात केली. वेतन आणि इतर प्रश्नांसंदर्भात ते आंदोलन करीत होते. या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या बससमोर 'शेम, शेम,' 'धिक्कार असो' अशी घोषणाबाजी केली तसेच रोजगारांसंदर्भात त्यांना जाब विचारला. त्यावर कुमारस्वामींनी त्यांच्यावर ओरडत आणि हातवारे करत ‘मोदींना मत दिलंत ना, मग कामाचं पण त्यांनाच विचारा,’ असे सुनावले. त्यांच्या या त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मुख्यमंत्र्यांच्या या अजब सल्ल्यामुळे आंदोलकही क्षणभर अचंबित झाले.

  • #WATCH Raichur: Workers from Yermarus Thermal Power Station protested before the bus of Karnataka CM HD Kumaraswamy over wages and other issues & raised slogans of 'Shame! Shame!', while he was on his way to Karegudda for his 'village stay prog'. The CM got angry on protesters. pic.twitter.com/FK3OI4limx

    — ANI (@ANI) June 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी कार्यक्रमासाठी गावात एक दिवस राहण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्यातील विरोधीपक्ष भाजपने याप्रकरणी एक पुस्तिका प्रकाशित करीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी एक दिवसाच्या थांब्यासाठी तब्बल १.२२ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. यावर कुमारस्वामी यांनी 'माझ्यावर होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. हा माझा वैयक्तिक दौरा होता. मला यासाठी भाजपकडून कोणतेही प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. मी माझ्या सद्सदविवेकबुद्धीने काम करीत असतो,' असे उत्तर दिले.
दरम्यान, या प्रकारावरून मोदी लाटेत पराभव झाल्यामुळे इतर पक्षांच्या नेत्यांना नैराश्याने ग्रासल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते मोदींना मते दिल्याच्या रागातून लोकांवरच संताप व्यक्त करत आहेत. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला इतर पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक मते मिळाली. मात्र, बहुमत सिद्ध न करू शकल्याने भाजप सत्तेत आला नाही. काँग्रेस आणि जेडीएस या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षांनी आघाडी करत सरकार स्थापन केले. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने देशभरात सपशेल बाजी मारली. यामुळे इतर पक्षनेत्यांना नैराश्य आल्याचे दिसत आहे.

Intro:Body:

‘मोदींना मत दिलंत ना, मग कामाचं पण त्यांनाच विचारा,’ मुख्यमंत्री कुमारस्वामी आंदोलकांवर भडकले

बंगळुरु - रोजगाराबाबत जाब विचारणाऱ्या आंदोलकांना कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अजब उत्तर दिले आहे. त्यांच्या या उत्तराने आंदोलकांसह त्यांचे समर्थकही अवाक् झाले. येरमारुस थर्मल पॉवर स्टेशनचे कर्मचारी मुख्यमंत्र्यांविरोधात वेतन आणि इतर प्रश्नांसंदर्भात ते आंदोलन करीत होते. भडकलेल्या कुमारस्वामींनी त्यांना आपले प्रश्न घेऊन चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारण्यास सांगितले.

मुख्यमंत्री कुमारस्वामी बसने कारेगुड्डा गावाकडे एका निवासी कार्यक्रमासाठी निघाले होते. दरम्यान त्यांची बस रायचूर येथे पोहोचल्यानंतर तेथे येरमारुस थर्मल पॉवर स्टेशनच्या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि घोषणाबाजीला सुरुवात केली. वेतन आणि इतर प्रश्नांसंदर्भात ते आंदोलन करीत होते. या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या बससमोर 'शेम, शेम,' 'धिक्कार असो' अशी घोषणाबाजी केली तसेच रोजगारांसंदर्भात त्यांना जाब विचारला. त्यावर कुमारस्वामींनी त्यांच्यावर ओरडत आणि हातवारे करत ‘मोदींना मत दिलंत ना, मग कामाचं पण त्यांनाच विचारा,’ असे सुनावले. त्यांच्या या त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मुख्यमंत्र्यांच्या या अजब सल्ल्यामुळे आंदोलकही क्षणभर अचंबित झाले.

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी कार्यक्रमासाठी गावात एक दिवस राहण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. राज्यातील विरोधीपक्ष भाजपाने याप्रकरणी एक पुस्तिका प्रकाशित करीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी एक दिवसाच्या थांब्यासाठी तब्बल १.२२ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. यावर कुमारस्वामी यांनी 'माझ्यावर होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. हा माझा वैयक्तिक दौरा होता. मला यासाठी भाजपकडून कोणतेही प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. मी माझ्या सद्सदविवेकबुद्धीने काम करीत असतो,' असे उत्तर दिले.

दरम्यान, या प्रकारावरून मोदी लाटेत पराभव झाल्यामुळे इतर पक्षांच्या नेत्यांना नैराश्याने ग्रासल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते मोदींना मते दिल्याच्या रागातून लोकांवरच संताप व्यक्त करत आहेत. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला इतर पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक मते मिळाली. मात्र, बहुमत सिद्ध न करू शकल्याने भाजप सत्तेत आला नाही. काँग्रेस आणि जेडीएस या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षांनी आघाडी करत सरकार स्थापन केले. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने देशभरात सपशेल बाजी मारली. यामुळे इतर पक्षनेत्यांना नैराश्य आल्याचे दिसत आहे.

आंदोलकांच्या या पवित्र्यानंतर ते चिडले आणि त्यांनी बसच्या खिडकीतून आंदोलकांवर ओरडायला सुरुवात केली. त्यानंतर ते आंदोलकांना म्हणाले, ‘तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिलं आहे तर त्यांनाच जॉबचं विचारा, मला काय विचारता?’ मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर क्षणभर आंदोलकही आवाक झाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.