ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश: कायदा सुव्यवस्थेवरून विरोधकांची टीका; 15 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या - उत्तर प्रदेश गुन्हेगारी दर

विकास दुबे प्रकरणावरुन कानपूर मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक दिनेश कुमार प्रभू यांची बदली झाशी जिल्ह्यात करण्यात आली आहे. कानपूरमधील पोलीस विकास दुबेच्या संपर्कात असल्यावरून अनेक आरोप झाले आहेत.

योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ
author img

By

Published : Jul 26, 2020, 5:34 PM IST

लखनऊ - उत्तर प्रदेश राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर मागील काही दिवसांपासून सतत होत आहे. कुख्यात गुंड विकास दुबेने 8 पोलिसांची गोळीबारात हत्या केल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्यामुळे 15 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे बोलले जात आहे. शनिवारी रात्री अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश काढण्यात आले.

विकास दुबे प्रकरणावरुन कानपूर मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक दिनेश कुमार प्रभू यांची बदली झाशी जिल्ह्यात करण्यात आली आहे. कानपूरमधील पोलीस विकास दुबेच्या संपर्कात असल्यावरून अनेक आरोप झाले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशीही सुरु आहे. दुबे प्रकरण आणि लॅब टेक्निशियन अपहरण प्रकरणात पोलिसांनी अपहरणकर्त्यांना खंडणी देण्याचा दिलेला सल्ला राज्यात चांगलाच गाजला आहे. आता प्रभू यांच्या जागी कानपूरचे पोलीस अधिक्षक म्हणून प्रितिंदर सिंह यांनी नेमणूक कऱण्यात आली आहे. सिहं आधी अलिगढ विभागात कार्यरत होते.

अमेठीचे पोलीस अधिक्षक ख्याती गर्ग यांची बदली लखनऊमध्ये करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी दिनेश सिंह अमेठीचे नवे पोलीस अधिक्षक असतील. अमेठीमध्ये दोन महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे प्रकरण जिल्ह्यात गाजले होते. पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूूमीवर गर्ग यांची बदली करण्यात आली आहे.

अयोध्येमध्ये 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. त्याआधीच जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक आशिष तिवारी यांची बदली करण्यात आली आहे. तिवारी यांना झाशी जिल्ह्यात रेल्वे विभागाचे पोलीस अधिक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी योगी सरकारला लक्ष्य केले आहे. ट्विटवरून त्यांनी मागील काही दिवसांत पोलीस आणि मंत्र्यांवर परिस्थिती हाताबाहेर गेल्याची टीका केली आहे. त्या पार्श्वभूमीवर 15 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.