बरासत (पश्चिम बंगाल) - दुर्गा पूजा व मोहरमचा सण एकाच दिवशी आला होता, त्यावेळी मी मोहरमच्या मिरवणुकीची वेळ बदलण्याचे आदेश दिले होते, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
बंगाल येथील बरासत येथे एका प्रचार सभेत ते बोलत होते. बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोलकाता येथे मंगळवारी गोंधळ निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत योगी आदित्यनाथ हे प्रचारासाठी बंगालमध्ये आले आहेत.
संपूर्ण देशात दूर्गा पूजा आणि मोहरम एकाच दिवशी आले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांनी मला विचारले की दुर्गा पूजेची वेळ बदलू का ? त्यावेळी मी त्यांना म्हणालो, दुर्गा पूजेची वेळ बदलू नका, जर तुम्हाला वेळ बदलायची असेल तर ती मोहरमच्या पूचेजी वेळ बदला.