आग्रा - ताजमहलाच्या दक्षिण-पश्चिम मिनारांची पडझड झाली आहे. मिनारांच्या अनेक दगडांची चमकही गेली आहे. अशा दगडांना बदलण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाकडून संरक्षण कार्य सुरू केले आहे. संरक्षण कार्यासाठी 23 लाख रुपये खर्च येणार असून 120 दिवसात हे कार्य पूर्ण होईल. ताजमहलाच्या चारी बाजूंनी मिनार बांधलेले आहेत. प्रत्येक मिनाराची उंची 140.91 फूट आहे. मिनार बनवण्यासाठी देखील संगमरवराचा वापर केलेला आहे.
याआधी तीन मिनारांचे दुरूस्ती कार्य
एएसआयच्या पुरातत्व अधीक्षक वसंत कुमार स्वर्णकार यांनी सांगितले की, पावसाच्या पाण्यामुळे मिनारांवरील दगडांचे नुकसान झाले आहे. त्याठिकाणी दुरुस्ती करायची आहे. मिनारा बाहेरील दगड देखील बदलण्यात येणार आहेत.
चार महिन्यांचा कालावधी
या संरक्षण कार्यात जवळपास 23 लाखांचा खर्च होईल, असे वसंत कुमार स्वर्णकार यांनी सांगितले. तसेच 120 दिवसांत काम पूर्ण होऊ शकते. एएसआयच्या पुरातत्व अधीक्षक वसंत कुमार स्वर्णकार यांनी सांगितले की, प्रत्येक मिनाराची उंची 42.95 मीटर किंवा 140.91 फीट आहे. उंची जास्त असल्याने मिनारांवरील निघालेले दगड खालून दिसून येत नाहीत. यापूर्वी केलेल्या दुरुस्ती कामात हे करण्याची गरज असल्याचे समजले होते. एएसआयने यापूर्वी ताजमहल की उत्तर-पूर्व आणि उत्तर-पश्चिम मिनारांचे काम केले होते.
हेही वाचा - झारखंडमधील 'देवघर' बनतोय सायबर क्राईमचा नवीन अड्डा