बंगळुरू (कर्नाटक)- कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी केंद्र आणि राज्याकडून लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे नागरिकांना जरी त्रास होत असला, तरी प्राणीमात्रांना त्याचा फायदा होत असल्याचे कोडागू जिल्ह्यात दिसून आले आहे. एरवी नागरिकांना पाहून घाबरून जाणारे किवा हल्ला करणारे प्राणी आता शहर परिसरात फिरत असताना दिसून आले आहे.
जिल्ह्यातील काही भागात हत्ती आणि हरिणांचा मुक्त संचार होताना दिसून आले आहे. परिसर शांत असले की जंगली प्राणी बाहेर पडतात. मात्र, शहरातील गोंगाट आणि रस्त्यावरील दाटीवाटीची वाहतूक पाहून जंगली प्राणी वनपरिसरातून बाहेर येण्यास टाळतात. मात्र, आता सर्वत्र शांती असल्याने जंगली प्राणी वनसीमेच्या बाहेरही जात असल्याचे दिसून येत आहे, असे कर्नाटकचे प्रधान मुख्य वन संरक्षक संजय मोहन यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे आता सर्वत्र शांती पसरली आहे. त्यामुळे हरीण देखील वनपरिसरातून बाहेर निघताना दिसून येत आहे. हरीण हे मुक्त संचार करणारे प्राणी आहेत. त्यांना जेव्हा परिसर शांत दिसते, त्यावेळी ते बाहेर पडतात आणि इतर ठिकाने शोधून काढतात. हरिणांप्रमाणे हत्ती देखील शांतता प्रिय प्राणी आहेत. आता सर्वत्र शांतता असल्याने ते देखील रस्त्यांवर आनंदाने फिरताना दिसून येत आहे, असे संजय मोहन यांनी सांगितले. तसेच, लॉकडाऊनमुळे माणव संचार देखील थांबला आहे. त्यामुळे, जंगलात शिकारीला लगाम बसल्याचे वनविभागाने सांगितले आहे.
हेही वाचा- 'ईस्टरचा सण आपल्याला कोरोनाशी लढण्याचे सामर्थ्य देईल'