कलबुर्गी - देव तारी त्याला कोण मारी' अशी म्हण प्रचलित आहे. त्याचाच प्रत्यय आज कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील एका रेल्वेस्थानकावर नागरिकांना पाहायला मिळाला आहे. रेल्वे रूळ ओलाडंताना एका महिलेच्या अंगावरून मालगाडी गेली. मात्र संपूर्ण रेल्वे गेल्यानंतर देखील त्या महिलेला कोणतीच दुखापत झाली नसल्याचं पाहायला मिळालाय.
संबधीत महिलेचे नाव मनीबाई चंदर आहे. चित्तापूर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना मनीबाई घसरुन खाली पडल्या. तितक्यात एक मालगाडी वेगाने आली. भांबावलेल्या असातानाही मनीबाई हुशारीने रुळावरील जमिनीवर पडून राहिल्या. यावेळी अक्षरशः त्याच्या अंगावरून धडधडत आलेल्या मालगाडीचे डबे गेली. मात्र त्यांना साधं खरचटलही नसून त्या बचावल्या आहेत.
हे ही वाचा - पाहा शाळेतल्या मुला-मुलीचा परफेक्ट स्टंट ! ३ लाखांहून अधिक व्ह्यूज
फलाटावर उभे असणाऱ्या सगळ्यांनी आपला श्वास रोखून धरला होता. सगळ्यांना वाटलं आता त्या संपल्या. मात्र काळ आला होता पण वेळ आली नव्हती. रेल्वे गेल्याबरोबर मनीबाई रुळाच्यामधून उठून बाहेर आल्या आणि लोकांनी सुटेचा नि:श्वास सोडला. त्यांच्या आश्चर्यकारक सुटकेनंतर लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांना कोणतीही इजा न झाल्यामुळे लवकरच सोडण्यात आले आहे.