ETV Bharat / bharat

रमजानच्या महिन्यात मतदान सकाळी सात ऐवजी पहाटे पाच वाजता होणार सुरू ? - ramzan

रमजानच्या काळात मतदानाची प्रक्रिया सकाळी सात ऐवजी पाच वाजता सुरु होणार का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. मे महिन्यामुळे तीव्र उन्हाळा असणार आहे. राजस्थान, इतर अतिउष्मा असणाऱ्या ठिकाणीही मतदान लवकर सुरू करावे का, यासंदर्भातही निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

सर्वोच्च न्यायालय
author img

By

Published : May 2, 2019, 3:05 PM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील सात पैकी चार टप्प्यांमधील मतदान पार पडले असून उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदानाच्या काळातच मुस्लीम समाजाचा रमजानचा महिना सुरू होत आहे. तेव्हा तीन टप्प्यांमधील मतदान सकाळी सातऐवजी पहाटे पाच वाजल्यापासून सुरु करावे, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिका मुस्लीम संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीदरम्यान 'निवडणूक आयोगाने यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा,' असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

त्यामुळे रमजानच्या काळात मतदानाची प्रक्रिया सकाळी सात ऐवजी पाच वाजता सुरु होणार का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये एकूण १६९ जागांसाठी मतदान होणार आहे. मुस्लीम समाजात रमजानचा महिना पवित्र मानला जातो. याशिवाय, मे महिन्यामुळे तीव्र उन्हाळा असणार आहे. राजस्थान तसेच, इतर अतिउष्मा असणाऱ्या ठिकाणीही मतदान प्रक्रिया लवकर सुरू करावी का, यासंदर्भातही निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. आता या याचिकांवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.