देहराडून : भारत-चीन सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर, उत्तराखंडच्या उत्तराक्षी भागामध्ये हवाई दलाने जास्त फेऱ्या मारण्यास सुरूवात केली आहे. सीमाभागातून लष्कर मागे हटले असले, तरीही हवाई दल मात्र सीमाभागात पूर्णपणे लक्ष ठेऊन आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जुलैला भारतीय सैन्याने सीमाभागाची हवाई पाहणी केली. तसेच, आज सकाळी उत्तराक्षीच्या चीन्यासीसौर धावपट्टीवर एन-३२ हे कार्गो विमान उतरताना दिसले. तर, याठिकाणी एक एमआय-१७ चॉपरही दिसून आले.
भारत-चीन सीमेवरुन दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. नुकतेच दोन्ही देशांनी एलएसी (लाईन ऑफ अॅक्चुअल कन्ट्रोल) जवळील सैन्याच्या मागे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन्ही देशांनी डी-एस्केलेशनची प्रक्रिया सुरू केली आहे.
१५ आणि १६ जूनला दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान भीषण झटापट झाली होती. गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या या झटापटीत देशाच्या २० जवानांना वीरमरण प्राप्त झाले होते. तर कित्येक सैनिक जखमी झाले होते.
हेही वाचा : सीमेवर 'जैसे थे' स्थिती ठेवण्यास सरकार आग्रही का नव्हते?