पन्ना (म.प्र)- माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ भाजप नेत्या उमा भारती यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची तुलना पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्याशी केली आहे. त्याचबरोबर, हे देघेही नेते नागरिकत्व संशोधन कायदाविषयी अफवा पसरवत असल्याचा आरोप देखील उमा भारती यांनी केला.
माजी मंत्री उमा भारती या पन्ना येथील एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. कार्यक्रमात भारती यांनी लागू झालेल्या नव्या नागरिकत्व संशोधन कायद्याचा भारतीय नागरिकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगितले. ते उमा भारती असो की ओवैसी या कायद्यामुळे कुणालाही नुकसान होणार नाही. या कायद्यामुळे कुणाचेही अधिकारी हिरावले जाणार नाही, असे उमा भारती यांनी सांगितले. मात्र, काही लोक दृष्ट विचारसरणीचे असतात व ते अफवा पसरवितात. अशा अफवांमुळेच भारताची फाळणी झाली होती, असे म्हणत उमा भारती यांनी काँग्रेसला टोमणा मारला. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची तुलना मोहम्मद अली जिना यांच्याशी केली.
त्याचबरोबर, फाळणीमुळे कोणालाही फायदा झाला नाही. मात्र, जिना सारखे लोक उदयास आले. आज जिन्हा नाही, मात्र राहुल जिन्हा आणि प्रियांका जिना हे पर्यावरणाला त्रास देत असून ते मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करत असल्याचे उमा भारती म्हणाल्या. इतक्यावरच न थांबता भारती यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा देखील समाचार घेतला. सोनिया यांचा मी सम्मान करते. मात्र, सोनिया गांधी यांचे वडिल इटलीमध्ये मोसोलिनी यांच्या सैन्यात होते, असे कोणी विचारले आहे का ? आम्ही सोनियांचा सम्मान करतो. आम्ही सोनियांना त्यांच्या नागरिकत्वाबाबत विचारले नाही तर मुस्लिमांना का कोणी प्रश्न करणार, असा सवालही माजी मंत्री उमा भारती यांनी केला.
हेही वाचा- 'जेएनयू वाद सोडविण्याबाबत शासनाच्या प्रस्तावावर अमल न करण्यास कुलगुरू ठाम, ही बाब धक्कादायक'