ETV Bharat / bharat

भोपाळमध्ये होणार तुल्यबळ लढत ; दिग्विजय सिंहांना भाजपचा 'हा' चॅलेंज

भोपाळच्या लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहाना उमेदवारी दिली आहे. या जागेवर भाजपही मजबूत उमेदवार देणार, अशी चर्चा सुरू आहे.

दिग्विजय सिंह आणि शिवराज चौहान
author img

By

Published : Mar 26, 2019, 12:41 PM IST

Updated : Mar 26, 2019, 4:21 PM IST

भोपाळ - लोकसभा निवडणुकांना केवळ १५ दिवस शिल्लक आहेत. सोमवारी पहिल्या टप्प्यातील नामांकन प्रक्रिया पार पडली. अनेक दिग्गज नेत्यांनी नामनिर्देशन पत्र भरले आहेत. मात्र, सर्वात मोठी लढत ही भोपाळ लोकसभा मतदार संघात ६व्या टप्प्यात होणार आहे. या मतदार संघात काँग्रेस नेते दिग्विजय सिंहांना भाजपकडून मोठे चॅलेंज मिळण्याची शक्यता आहे.

भोपाळच्या लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहाना उमेदवारी दिली आहे. या जागेवर भाजपही मजबूत उमेदवार देणार, अशी चर्चा सुरू आहे. भाजप यासाठी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना रिंगणात उतरवू शकते.

भोपाळ मतदार संघात दिग्विजय सिंहाना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या पारड्यात मोठी खळबळ उठली होती. कारण दिग्विजय सिंहांना मध्यप्रदेशामध्ये निवडणूक लढवण्याचा आणि लढण्याचा मोठा अनुभव आहे. तेथील कार्यकर्त्यांवर दिग्विजय सिंहांची मोठी पकड आहे, असे म्हटले जाते. त्यामुळेच मागील ३५ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या भोपाळच्या जागेसाठी पक्षात तारांबळ उडालेली आहे.

तर, काँग्रेसने नुकतेच मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्याप्रमाणात विजय संपादन केले आहे. त्यामुळे भाजप आधीच चिंतेत डुबलेली आहे. परंतु, असे असतानाही भाजप या जागेसाठी मोठी खेळी खेळणार, असे चित्र आहे. म्हणून या जागेवर भाजप शिवराज सिंहांवर डाव लावण्याची शक्यता आहे.

Intro:Body:

काँग्रेसकडून ४० जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; राहुल, सोनिया, प्रियांकासह विखे पाटलांचा समावेश

Star campaigners of congress for 1st and 2nd pahse of Lok sabha elections from maharashtra

Star campaigners, congress, Lok sabha elections , maharashtra, काँग्रेस, लोकसभा निवडणूक, महाराष्ट्र

मुंबई - काँग्रेसने महाराष्ट्रातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये  सोनिया गांधीसह प्रियांका गांधींचाही समावेश आहे. तसेच राज्यात खासदार अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

स्टार प्रचारकांची यादीमध्ये राज्यातील 'या' लोकांचा समावेश -

अशोक चव्हाण

राधाकृष्ण विखे पाटील

सुशील कुमार शिंदे

पृथ्वीराज चव्हाण

बाळासाहेब थोरात

मुकुल वासनिक

विजय वडेट्टीवार

विलास मुत्तेमवार

राजीव सातव

Conclusion:
Last Updated : Mar 26, 2019, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.