ETV Bharat / bharat

Top 10 @ 11PM : रात्री अकराच्या ठळक बातम्या! - देशातील टॉप बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top Ten news
Top 10 @ 11PM : रात्री अकराच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : Dec 16, 2020, 3:10 PM IST

Updated : Dec 16, 2020, 10:55 PM IST

  • नवी दिल्ली - केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तोंड गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. ६० लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला आहे. यातून मिळणारे उत्पन्न आणि आणि अनुदान ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोड बातमी, साडेतीन हजार कोटींचे अनुदान थेट खात्यावर जमा होणार

  • मुंबई - आज राज्यात ४,३०४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,८०,८९३ वर पोहोचला आहे. राज्यात आज ९५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४८,४३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट - राज्यात दिवसभरात ४,३०४ जणांना कोरोना, 95 जणांचा मृत्यू

  • नाशिक - पाकिस्तानातून आपल्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी आलेली मूकबधीर गीता आता नाशिकला पोहचली आहे. नाशिकच्या एकलहरा भागात राहणाऱ्या रमेश सोळसे यांनी गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला आहे. लहानपणी तिच्या आईने गीताला रेल्वेत सोडून दिल्याचे रमेश यांचे म्हणणे आहे. गीता ही नाशिकरोड मार्गाने दिल्ली आणि नंतर लाहोरला पोहचली असल्याचा अंदाज रमेश यांनी व्यक्त केला. यावेळी रमेश यांनी गीताचा जन्मदाखला दाखवत गीताला गावाची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, गीता हिचे समाधान झाले नाही.

पाकिस्तानातून परतलेली गीता कुटुंबाच्या शोधात नाशिकमध्ये; माझी मुलगी असल्याचा रमेश सोळसेंचा दावा

  • नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून शेतकऱयांचे कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. यातच एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंघू बॉर्डरवर एका शेतकऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. पानिपतच्या पार्क रुग्णालयामध्ये शेतकऱ्याचा मृतदेह आणण्यात आला आहे. याप्रकरणी सोनिपत पोलीस तपास करत असून संबधित शेतकरी हा कर्नालमधील रहिवासी असल्याची माहिती आहे.

सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्याची स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या

  • मुंबई - भाजपमध्ये मागील वर्षभरापासून नाराज असलेल्या आणि पक्षाच्या एकूणच कामकाज आणि व्यवस्थेशी उबगलेले तब्बल डझनभर भाजप आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

'राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती.. भाजपचे डझनभर आमदार करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश'

  • नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत मागील २० दिवसांपासून केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावर अद्यापही तोडगा निघाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनावरून चिंता व्यक्त केली आहे. सरकारने यावर समिती स्थापन करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. शेतकरी आंदोलनाला तीन आठवडे झाले असून पंजाब, हरयाणासह विविध राज्यातील शेतकरी सिंघू सीमेकडे कूच करत आहेत.

शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करा - सर्वोच्च न्यायालय

  • मुंबई - कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे कामकाज थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. यासोबतच एमएमआरडीएला आतापर्यंत झालेले काम जैसे थे ठेवण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जमिनीवरून पुन्हा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर केंद्र सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली होती. मात्र, ही जमीन जिल्हाधिकार्‍यांनी एमएमआरडीएला हस्तांतरित केल्याच्या निर्णयायावर मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. यावर आज (बुधवार) उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.

उच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका! कांजूर मेट्रो कारशेडच्या कामाला दिली तात्काळ स्थगिती

  • नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाचा आज २१वा दिवस आहे. सध्या दिल्लीच्या सर्व सीमांवर हजारो शेतकरी आंदोलनासाठी ठाण मांडून बसले आहेत. सरकारसोबतच्या आतापर्यंतच्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या असून, कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आज दिल्ली-नोएडाची छिल्ला सीमा पूर्णपणे बंद केली आहे.

दिल्ली चलो आंदोलन : शेतकऱ्यांनी केली छिल्ला सीमा बंद!

  • रायगड - जेएनपीटी बंदराच्या खासगीकरणाविरोधात आणि केंद्र सरकारच्या पीपीपी धोरणाविरोधात कामगार आक्रमक झाले आहेत. हे देशातील सर्वात मोठं बंदर आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांनी केंद्र सरकारविरोधात महामोर्चा काढला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) प्रशासन भवानाजवळ कामगारांनी निदर्शने सुरू केली आहेत. यावेळी बंदराचे कामकाज पूर्णपणे बंद ठप्प झाले आहे. यामुळे बंदराला कोट्यवधींचा फटका बसणार आहे. खासगीकरणाचे निर्णय रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा कामगारांनी निर्धार केला आहे. जेएनपीटी बंदराच्या 33 वर्षांच्या काळातील हे सर्वात मोठं आंदोलन असल्याचं म्हटलं जातंय. आंदोलनामुळे पोलिसांनीही चोख बंदोबस्त तैनात ठेवला आहे.

जेएनपीटी बंदरात हजारो कामगार एकवटले... खासगीकरणाविरोधात केंद्र सरकारचा निषेध

  • नवी दिल्ली : १९७१साली झालेल्या ऐतिहासिक अशा भारत-पाकिस्तान युद्धाला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने दिल्लीच्या विजय स्तंभावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अभिवादन केले. यासोबतच, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनीही विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विजय दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन; ७१च्या ऐतिहासिक युद्धाला झाली ५० वर्षं

Last Updated : Dec 16, 2020, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.