ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरापर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news stories around the globe
Top 10 @ 11 PM : रात्री अकरावाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...
author img

By

Published : Dec 2, 2020, 7:01 AM IST

Updated : Dec 2, 2020, 10:43 PM IST

  • मुंबई - बुधवारी (दि. २ डिसेंबर) राज्यात ५ हजार ६०० नवीन कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाख ३२ हजार १७६ वर पोहोचला आहे. राज्यात आज १११ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४७ हजार ३५७ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात ८८ हजार ५३७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सविस्तर वाचा- राज्यात ५ हजार ६०० नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, १११ रुग्णांचा मृत्यू

  • अकोला - समोरून येणाऱ्या मोटरसायकलला टाटा 407 ट्रकची धडक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी तेल्हारा तालुक्यातील आडसूळ नजीक शेगाव अकोट रोडवर हा अपघात झाला.

सविस्तर वाचा- शेगाव-अकोट रोडवर कापसाने भरलेल्या ट्रकची दुचाकीला धडक; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर

  • मुंबई - सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय आज (बुधवार) मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असून, महाराष्ट्रात आता वस्त्यांना जातीवाचक नावे देण्याची प्रथा हद्दपार करण्यात आली आहे. वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची नावे द्यावीत, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

सविस्तर वाचा- वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय; सामाजिक न्याय विभागाने मांडला होता प्रस्ताव

  • रत्नागिरी - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची लोटे येथील मालमत्ता स्थानिक ग्रामस्थ रविंद्र दत्ताराम काते यांनी लिलावात घेतली आहे. काते यांनी लिलावात भाग घेऊन व सर्वाधिक बोली लावून १ कोटी १० लाख १० हजार ५१ या किमतीला ही मालमत्ता खरेदी केली . सेफेमा यांनी हा ऑनलाईन लिलाव मंगळवारी (१ डिसेंबर) आयोजित केला होता, हा लिलाव स्थानिक ग्रामस्थ रविंद्र काते यांनी जिंकला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरचा लिलाव व्हिडीओ कॉन्सफरन्सद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.

सविस्तर वाचा- दाऊद इब्राहिमच्या लोटेतील मालमत्तेचा लिलाव, ग्रामस्थ रविंद्र कातेंनी जिंकली बोली

  • नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असतानाच नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारबरोबरच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर टीका केली. शेतकरी आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी दिल्लीतील ९ स्टेडियमचे तात्पुरत्या तुरुंगात रुपांतर करण्यास परवानगी न दिल्याने केंद्र सरकार माझ्यावर नाराज असल्याचे केजरीवाल म्हणाले.

सविस्तर वाचा- 'स्टेडियमचं रुपांतर तात्पुरत्या तुरुंगात करण्याची परवानगी नाकारल्यानं केंद्र सरकार नाराज'

  • मुंबई - मुंबईतील फिल्म सिटी मुंबईतून काही हलणार नाही. सर्व कलाकार तिथे जाणार नाहीत. मुंबई दौऱ्यावर आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी नवीन फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केल्यानंतर आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ई-रिक्षाचे अनावरण केल्यानंतर माध्यमांशी ते बोलत नाहीत.

सविस्तर वाचा- बॉलिवूड मुंबईतून काही हलणार नाही- रामदास आठवले

  • मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल मुंबई दौऱ्यावर आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे यावेळी ते काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी व फिल्मसिटीसाठी चर्चा करण्यासाठी मुंबईत आले आहेत. यावर मनसेने आक्षेप घेत त्यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. ते ज्या ठिकाणी आले आहेत, त्या हॉटेलखाली बॅनर लावले आहेत. मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला 'ठग' असे बॅनर लावून योगींचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा- योगी यांच्या मुंबई दौऱ्याविरोधात मनसेची बॅनरबाजी, योगींना म्हणाले "ठग"

  • नाशिक- त्र्यंबकेश्वर जवळील हरिहर किल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरुन महिला पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुपाली चौधरी (वय 35 ) असे त्या महिलेचे नाव असून काही पर्यटकांच्या म्हणण्यानुसार ह्या महिलेने स्वतःहून उडी मारली. त्यामुळे हा अपघात होता की आत्महत्या याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सविस्तर वाचा- हरिहर किल्ल्यावर फोटो काढायच्या नादात महिलेचा मृत्यू; अपघात की आत्महत्या?

  • नवी दिल्ली -देशात गेल्या 24 तासांमध्ये 31 हजार 118 नवे करोनाबाधित आढळले असून, 41 हजार 985 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 482 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 94 लाख 62 हजार 810 वर पोहोचली आहे.

सविस्तर वाचा- देशात गेल्या 24 तासांमध्ये 31 हजार 118 नवे कोरोनाबाधित, 482 जणांचा मृत्यू

  • कॅनबेरा - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नव्या विक्रमाला गवसणी घातली. एकदिवसीय प्रकारात १२ हजार धावा ठोकणारा विराट वेगवान फलंदाज ठरला. मानुका ओव्हल मैदानावर विराटने ही जबरदस्त कामगिरी नोंदवली.

सविस्तर वाचा- विराटचा वनडेत भीमपराक्रम, क्रिकेटच्या देवाला टाकले मागे

Last Updated : Dec 2, 2020, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.