श्योपूर - पोलीस आणि डॉक्टरांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली मध्य प्रदेश पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. बुधवारी हा हल्ला करण्यात आला होता.
सध्या जगासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक राज्यातील प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये डॉक्टर्स, पोलीस जनजागृती करत आहेत. बुधवारी कोरोनाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जात असताना या पथकावर हल्ला करण्यात आला होता.