ETV Bharat / bharat

अमेरिकेतील भारतीय दूत म्हणून तरणजितसिंग संधूंनी स्वीकारला पदभार - तरणजीतसिंग संधू

अमेरिकेतील भारतीय दूतावासाने याबाबत ट्विट करत माहिती दिली. "अमेरिकेतील भारताचे दूत म्हणून नियुक्त झालेले तरणजीत सिंग संधू यांनी आज भारतीय दूतावासात आपला पदभार स्वीकारला. अमेरिकेतील मिशनचे उपप्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले", अशा आशयाचे ट्विट दूतावासाने केले आहे.

Taranjit Singh Sandhu takes charge as Indian envoy to US
अमेरिकेतील भारतीय दूत म्हणून तरणजीतसिंग संधूंनी स्वीकारला पदभार
author img

By

Published : Feb 4, 2020, 10:20 AM IST

वॉशिंग्टन - मुत्सद्दी तरणजितसिंग संधू यांनी सोमवारी (स्थानिक वेळेनुसार) अमेरिकेतील भारतीय राजदूत म्हणून पदभार स्वीकारला. अमेरिकेतील मिशनचे उपप्रमुख अमित कुमार आणि इतर अधिकाऱ्यांनी संधूंचे जोरदार स्वागत केले. याआधी या पदावर हर्षवर्धन श्रृंगला होते. त्यांची आता परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाली आहे.

अमेरिकेतील भारतीय दूतावासाने याबाबत ट्विट करत माहिती दिली. "अमेरिकेतील भारताचे दूत म्हणून नियुक्त झालेले तरणजित सिंग संधू यांनी आज भारतीय दूतावासात आपला पदभार स्वीकारला. अमेरिकेतील मिशनचे उपप्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले", अशा आशयाचे ट्विट दूतावासाने केले आहे.

संधू यांनी याआधीही भारतीय मिशनमध्ये काम केले आहे. ते जुलै २०१३ ते जानेवारी २०१७ पर्यंत अमेरिकेतील भारतीय मिशनचे उपप्रमुख होते. त्यापूर्वी, ते 1997 ते 2000 पर्यंत अमेरिकन कॉंग्रेसशी संपर्क साधण्यासाठी वॉशिंग्टन डीसीच्या भारतीय दूतावासात प्रथम सचिव (राजकीय) होते.

हेही वाचा : इस्लामिक सहकार संस्थेने फेटाळली ट्रम्प यांची 'शांतता योजना'

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.