ETV Bharat / bharat

'सुवेंदू अधिकारींचा भाजपा प्रवेशाचा निर्णय वैयक्तीक, मी तृणमूलमध्ये राहणार'

author img

By

Published : Dec 20, 2020, 1:06 PM IST

तृणमूल काँग्रेसेचे मोठे नेते सुवेंदू अधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने मुख्यमंत्री ममता ब‌ॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. सुवेंदू यांच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांचे भाऊ दिब्येंदू अधिकारी ही भाजपामध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, दिब्येंदू अधिकारी यांनी आपण ममता ब‌ॅनर्जी यांचा कार्यकर्ता असून मी त्यांच्यासाठीच लढत राहणार, असे स्पष्ट केले आहे.

दिब्येंदू अधिकारी
दिब्येंदू अधिकारी

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या हालचालींनी वेग घेतलाय. केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस यांचा थेट सामना रंगणार आहे. तृणमूल काँग्रेसेचे मोठे नेते सुवेंदू अधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने मुख्यमंत्री ममता ब‌ॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. सुवेंदू यांच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांचे भाऊ दिब्येंदू अधिकारी ही भाजपामध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, दिब्येंदू अधिकारी यांनी आपण ममता ब‌ॅनर्जी यांचा कार्यकर्ता असून मी त्यांच्यासाठीच लढत राहणार, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चांवर पडदा पडला.

मी ममता ब‌ॅनर्जी यांचा कार्यकर्ता आहे आणि भविष्यातही मी त्यांच्याचसोबत राहणार आहे. सुवेंदू अधिकारी यांचा भाजपामध्ये जाण्याचा निर्णय त्यांचा स्वतःचा आहे. आम्ही एकाच कुटुंबातील आहोत, हे नाकारण्यासारखे नाही. मात्र, मी तृणमूलचा खासदार आहे आणि कायम राहणार, असे दिब्येंदू अधिकारी म्हणाले.

शिशिर अधिकारी यांची प्रतिक्रिया नाही -

सुवेंदू अधिकारी यांच्या भाजपा प्रवेशावर दिब्येंदू अधिकारी यांनी आपली बाजू स्पष्ट केली. मात्र, सुवेंदू अधिकारी यांचे वडिल माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शिशिर अधिकारी यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सुवेंदू अधिकारी यांचा भाजपामध्ये प्रवेश -

तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज शनिवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, त्याचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला नसून त्यांना 21 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. राजीनाम्यात तारीख स्पष्ट न केल्यामुळे तो स्वीकारला नसल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

प. बंगालमध्ये राजकीय स्थिती काय?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे 148 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. गेली निवडणूक 2016 मध्ये पार पडली होती. ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाने 211 जागांवरील विजयासह सपशेल बहुमत मिळवले व पश्चिम बंगालमधील आपली सत्ता राखली. तर काँग्रेसला 44 , डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.

हेही वाचा - दीदीं’ना हादरा; तृणमूलच्या बड्या नेत्याने केला भाजपामध्ये प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.