ETV Bharat / bharat

झारखंड : चाईबासात जादूटोणा प्रकरणात ८ जणांचा बळी? वाचलेल्या व्यक्तीने सांगितली कहाणी - झारखंड जादूटोणा न्यूज

दरम्यान, ईटीव्ही भारतने पोलीस उपविभागीय अधिकारी (एसडीओपी) अमर कुमार पांडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अशी कोणतीही घटनी घडली नसल्याचे सांगितले. मात्र, सुरीन याचे कुटुंब अनेक वर्षांपासून 'जादूटोण्या'मध्ये गुंतले आहे आणि याच प्रकरणात एका वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचीही हत्या केली गेली होती, असे त्यांनी सांगितले.

झारखंड जादूटोणा प्रकरणात ८ बळी
झारखंड जादूटोणा प्रकरणात ८ बळी
author img

By

Published : Oct 14, 2020, 10:31 AM IST

चाईबासा (झारखंड) - झारखंडच्या चाईबासामध्ये मंगळवारी जादूटोणा केल्याच्या संशयावरून आठ जणांना ठार करण्यात आले. वृत्तानुसार, एक आदिवासी व्यक्ती अत्यंत गंभीर जखमी स्थितीत सदर रुग्णालयात दाखल झाली. गुमदी सुरीन असे या व्यक्तीचे नाव आहे. आपल्या काकांनी आपल्या कुटुंबातील 8 जणांची हत्या केली, असा थेट आरोप त्याने केला आहे.

"माझे आणि माझ्या काकांचे नाव एकच आहे - गुमदी सुरीन. मी गेल्या 10-15 दिवसांपासून काब्रागुटू येथे माझ्या सासरच्या घरात राहत आहे. माझे काका मला मारण्यासाठी येथे आले होते. मात्र, मी घटनास्थळावरून पळून गेलो आणि माझ्या बहिणीच्या पोहोचण्यात यशस्वी झालो. तिने मला दवाखान्यात नेले. माझ्या काकांनी त्यांच्या कुटुंबातील त्यांचा भाऊ-वहिनी, दोन पुतण्या, एक पुतणा आणि तीन नात-नातवांसह 8 जणांची हत्या केल्याचा मला संशय आहे', असे सुरीन म्हणाला. तसेच, काकाने आपल्यालाही गळा चिरून मारण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा - राजस्थान : लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपी अटकेत

काकांनी आपल्या पत्नीची हत्या केली असावी आणि आपल्या काकूवरती कथितरीत्या सामूहिक बलात्कार झाल्याबद्दलही शंका उपस्थित केली, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, ईटीव्ही भारतने पोलीस उपविभागीय अधिकारी (एसडीओपी) अमर कुमार पांडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अशी कोणतीही घटनी घडली नसल्याचे सांगितले. मात्र, सुरीन याचे कुटुंब अनेक वर्षांपासून 'जादूटोण्या'मध्ये गुंतले आहे आणि याच प्रकरणात एका वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचीही हत्या केली गेली होती, असे त्यांनी सांगितले.

1990 ते 2000 या काळात झारखंडमध्ये चेटकीण असल्याच्या नावाखाली 522 महिलांची निर्घृण हत्या करण्यात आली. झारखंड स्वतंत्र राज्य झाल्यानंतर ‘चेटूक अंधश्रद्धे’शी संबंधित घटना वेगाने वाढल्या आहेत. 2000 ते 2019 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत यात 1800 महिलांचा बळी गेला आहे.

अशा प्रकारची सर्वाधिक प्रकरणे चाईबासा आणि सरायकेलाची असून तेथे एकूण 233 महिलांची हत्या करण्यात आली आहे. 2020 मध्ये, 31 जुलैपर्यंत झारखंडमध्ये ‘चेटूक बिसाही’ या नावाने छळाच्या 18 घटना घडल्या आहेत.

हेही वाचा - अनेक आजारांवर गुणकारी छत्तीसगडमधील प्रसिद्ध 'चापडा चटणी'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.