नवी दिल्ली - कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. 'कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांना आमदारांच्या राजीनाम्यांवर तातडीने किंवा विशिष्ट कालावधीत निर्णय देण्याची सक्ती करता येणार नाही,' असा निकाल न्यायालयाने दिला. त्याचबरोबर, विश्वासदर्शक ठरावावेळी उपस्थित राहणे बंडखोर आमदारांना बंधनकारक करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयामुळे कुमारस्वामींचे सरकार धोक्यात आले आहे.
हेही वाचा - बंडखोर आमदारांच्या राजीनामा याचिकेवर आज 'सर्वोच्च निर्णय'
उद्या कर्नाटक विधानसभेत राज्य सरकारला विश्वासदर्शक ठरावाने बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांविषयी दिलेल्या निर्णयामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामींची डोकेदुखी वाढली आहे. अनेक दिवसांपासून कर्नाटकात राजकीय वादळ उठले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयामुळे यामध्ये निर्णायक वळण घेणारी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव सिद्ध करून दाखवावा अथवा, राजीनामा द्यावा - येदियुराप्पा