ऋषिकेश - सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे.दरम्यान, बाहेरील देशात अडकलेल्या भारतीयांना भारत सरकारने मायदेशी आणले आहे. अजूनही अनेक भारतीय परदेशात अडकले आहेत. यात जवळपास 600 भारतीय एमबीबीएसचे विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले आहेत.
ऋषिकेश येथील एमबीबीएसची विद्यार्थीनी असलेली तमन्ना त्यागी ही लॉकडाऊनमुळे युक्रेनमध्ये अडकली आहे.तमन्नासोबतच उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे जवळपास 600 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत भारत सरकारकडे मदत मागितली आहे. तसेच लवकरात लवकर भारतात घेऊन येण्याची विनंती केली आहे. तसेच तमन्ना त्यागीच्या कुटुंबीयांनीही मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत मदत करण्याची मागणी केली आहे.
मुलांच्या होस्टेमधील सर्व खानावळ बंद झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जेवणायी सोय होत नाही. मेडिकलचीही सुविधा नाहीत. त्यामुळे सर्व विद्यार्थी चिंतेत आहेत. त्यामुळे त्याना लवकर मायदेसी घेऊन येण्याची मागणी या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी भारत सरकारकडे केली आहे.