नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवा; अन्यथा, नद्यांचे पाणी थांबवले जाईल, असा इशारा दिला आहे. असे करण्यास भारत कचरणार नाही, असेही गडकरी यांनी म्हटले आहे. 'केंद्र सरकारने भारतातील नद्यांचे पाकिस्तानात जाणारे पाणी थांबवण्यासाठी आधीच मार्ग तयार करण्यास सुरुवात केली आहे,' असे ते म्हणाले. ते अमृतसरमधील भाजप उमेदवार हरदीप पूरी यांच्या प्रचारसबेत बोलत होते.
सरकार पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात ६ धरणे बांधण्याची योजना बनवत आहे. येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हे पाऊल लवकरात लवकर उचलण्यात येणार आहे.
'१९६० मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान शांततापूर्ण संबंधांच्या आधारावर नद्यांच्या पाण्यासंदर्भात करार झाला होता. मात्र, सध्या शांततेचा चेहरा बदलून तो दहशतवादाचा झाला आहे. अशा स्थितीत भारत कठोर निर्णय घेण्यास वेळ लावणार नाही. भारतातून पाकिस्तानला जाणाऱ्या नद्यांचे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला जाईल,' असे गडकरी म्हणाले.
'हे पाणी पंजाब आणि हरियाणातील शेतीसाठी देण्यात येईल,' असे ते म्हणाले. मोदी सरकारने 'मागील ५ दशकांत जे झाले नव्हते, ते ५ वर्षांत करून दाखवले,' असा दावाही त्यांनी केला.
'भाजप सरकार अमृतसरसह ६ शहरांमध्ये डबल डेकर एअर बस सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच, सरकार दिल्ली-अमृतसर-कतरा द्रुतगती मार्ग तयार करण्याचे आश्वासन दिले. यामुळे प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत ४ तासांची बचत होईल,' असेही गडकरी म्हणाले.
दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवा; अन्यथा, नद्यांचे पाणी अडवू- गडकरी - nitin gadkari
'हे पाणी पंजाब आणि हरियाणातील शेतीसाठी देण्यात येईल. सरकार पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात ६ धरणे बांधण्याची योजना बनवत आहे. येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हे पाऊल लवकरात लवकर उचलण्यात येणार आहे.'
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवा; अन्यथा, नद्यांचे पाणी थांबवले जाईल, असा इशारा दिला आहे. असे करण्यास भारत कचरणार नाही, असेही गडकरी यांनी म्हटले आहे. 'केंद्र सरकारने भारतातील नद्यांचे पाकिस्तानात जाणारे पाणी थांबवण्यासाठी आधीच मार्ग तयार करण्यास सुरुवात केली आहे,' असे ते म्हणाले. ते अमृतसरमधील भाजप उमेदवार हरदीप पूरी यांच्या प्रचारसबेत बोलत होते.
सरकार पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात ६ धरणे बांधण्याची योजना बनवत आहे. येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हे पाऊल लवकरात लवकर उचलण्यात येणार आहे.
'१९६० मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान शांततापूर्ण संबंधांच्या आधारावर नद्यांच्या पाण्यासंदर्भात करार झाला होता. मात्र, सध्या शांततेचा चेहरा बदलून तो दहशतवादाचा झाला आहे. अशा स्थितीत भारत कठोर निर्णय घेण्यास वेळ लावणार नाही. भारतातून पाकिस्तानला जाणाऱ्या नद्यांचे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला जाईल,' असे गडकरी म्हणाले.
'हे पाणी पंजाब आणि हरियाणातील शेतीसाठी देण्यात येईल,' असे ते म्हणाले. मोदी सरकारने 'मागील ५ दशकांत जे झाले नव्हते, ते ५ वर्षांत करून दाखवले,' असा दावाही त्यांनी केला.
'भाजप सरकार अमृतसरसह ६ शहरांमध्ये डबल डेकर एअर बस सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच, सरकार दिल्ली-अमृतसर-कतरा द्रुतगती मार्ग तयार करण्याचे आश्वासन दिले. यामुळे प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत ४ तासांची बचत होईल,' असेही गडकरी म्हणाले.
दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवा; अन्यथा, नद्यांचे पाणी अडवू- गडकरी

Conclusion: