बंगळुरू - कर्नाटकमधील भाजप सरकारने विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्यानंतर विधानसभा सभापती रमेश कुमार यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी आज विश्वासदर्शक प्रस्ताव सभागृहात मांडला होता.
-
Bengaluru: #Karnataka legislative assembly speaker KR Ramesh Kumar tenders his resignation from the post. pic.twitter.com/GW2U63pXQ7
— ANI (@ANI) July 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bengaluru: #Karnataka legislative assembly speaker KR Ramesh Kumar tenders his resignation from the post. pic.twitter.com/GW2U63pXQ7
— ANI (@ANI) July 29, 2019Bengaluru: #Karnataka legislative assembly speaker KR Ramesh Kumar tenders his resignation from the post. pic.twitter.com/GW2U63pXQ7
— ANI (@ANI) July 29, 2019
'विरोधीपक्षाची व्यक्ती अध्यक्ष होऊ शकत नाही. आम्ही कुमार यांच्या राजीनाम्याची वाट पाहू. जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांच्याविरुद्ध आम्ही अविश्वास ठराव मांडू' , असे भाजपच्या एका आमदाराने सांगितले होते.
काँग्रेस-जेडी(एस)च्या आमदारांनी भाजपशी हातमिळवणी करून पक्षाशी द्रोह केला होता. त्यामुळे काँग्रेस-जेडी(एस)चे सरकार बहुमत चाचणीत फेल झाले. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळ्यानंतर येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी त्यांना आजपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सध्या जपाकडे १०६ आमदारांचे संख्याबळ आहे. तर काँग्रेस आणि जेडीएसकडे १०० आमदारांचे संख्याबळ आहे.