नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. चार हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यामुळे युद्धपातळीवर काम सुरू आहे. अशातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून कोरोना विरोधात लढण्यासाठी पर्याय सुचविले आहेत.
प्रधानमंत्री, मंत्री आणि इतर संसद सदस्यांच्या वेतनात एक वर्षासाठी 30 टक्क्यांची कपात करण्यात येईल. तसेच खासदारांना दिला जाणार निधी दोन वर्षांसाठी बंद करण्यात यावा, असा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत झाला होता. या निर्णयाचे सोनिया गांधी यांनी समर्थन केले आहे. या सोबतच त्यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारला पाच मुद्दे सुचविले आहेत.
-
Congress President and CPP Chairperson Smt. Sonia Gandhi writes to PM Modi suggesting various measures to fight the COVID-19 pandemic. pic.twitter.com/77MzCYiokl
— Congress (@INCIndia) April 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congress President and CPP Chairperson Smt. Sonia Gandhi writes to PM Modi suggesting various measures to fight the COVID-19 pandemic. pic.twitter.com/77MzCYiokl
— Congress (@INCIndia) April 7, 2020Congress President and CPP Chairperson Smt. Sonia Gandhi writes to PM Modi suggesting various measures to fight the COVID-19 pandemic. pic.twitter.com/77MzCYiokl
— Congress (@INCIndia) April 7, 2020
कोणते पाच मुद्दे सोनिया गांधीनी सुचविले
१) सरकारद्वारे टेलिव्हिजन, प्रिंट आणि ऑनलाइन मीडियाला दिल्या जाणाऱ्या सगळ्या जाहिराती थांबवण्यात याव्यात. दोन वर्षांसाठी हा निर्णय घेतला तर १२५० कोटींची बचत दरवर्षी होईल. हा निधी कोरोनासाठी लढण्यास उपयुक्त ठरु शकतो. फक्त कोरोनाशी संबधीत जाहीरीतींना परवानगी असावी.
२) सरकारी इमारतींच्या बांधकामांसाठी जे २० हजार कोटी मंजूर करण्यात आले आहेत ती मंजुरी मागे घ्यावी. संसदेच्या सध्याच्या इमारतीत चांगले काम होते आहे. सरकारने हा निधी रुग्णालय सुधारणा, आरोग्य सुरक्षा उपकरणे यासाठी खर्च करावा.
३) खासदारांचे वेतन, निवृत्ती वेतनमध्ये जी ३० टक्के कपात करण्यात आली आहे तो निधी कामगार वर्ग, शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांना उभारी देण्यासाठी खर्च करण्यात यावा.
४) राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अधिकारी यांचे विदेश दौरे थांबवण्यात यावेत. या प्रवासखर्चाची जी बचत होईल ती रक्कम कोरोनाविरोधी लढाईसाठी वापरण्यात यावी.
५) पीएम केअर्स फंडामध्ये जो निधी जमा होत आहे तो पंतप्रधान मदत निधीमध्ये वर्ग करण्यात यावा.