नवी दिल्ली - गांधीजींच्या नावाचा वापर करून काही लोक, देशाला त्यांनी दाखवून दिलेल्या पथावरून नव्हे तर, आपल्याला हव्या त्या मार्गावरून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. असे बरेच लोक देशात याआधीही होऊन गेलेत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये साम-दाम-दंड-भेद या नीतींचा वापर करून हे लोक स्वतःला खूपच शक्तीशाली समजू लागले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या आज गांधीजयंतीनिमित्त बोलत होत्या.
-
Sonia Gandhi, Congress: Bharat aur Gandhi ji ek doosre ke paryay hain, ye alag baat hai aaj kal kuch logon ne ise ulta karne ki zid pakad li hai. Vo chahte hain ki Gandhi ji nahi balki RSS Bharat ka pratik ban jayein. 2/2 https://t.co/B9kMAn9wM0
— ANI (@ANI) October 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sonia Gandhi, Congress: Bharat aur Gandhi ji ek doosre ke paryay hain, ye alag baat hai aaj kal kuch logon ne ise ulta karne ki zid pakad li hai. Vo chahte hain ki Gandhi ji nahi balki RSS Bharat ka pratik ban jayein. 2/2 https://t.co/B9kMAn9wM0
— ANI (@ANI) October 2, 2019Sonia Gandhi, Congress: Bharat aur Gandhi ji ek doosre ke paryay hain, ye alag baat hai aaj kal kuch logon ne ise ulta karne ki zid pakad li hai. Vo chahte hain ki Gandhi ji nahi balki RSS Bharat ka pratik ban jayein. 2/2 https://t.co/B9kMAn9wM0
— ANI (@ANI) October 2, 2019
भारत आणि गांधी हे जणू एकमेकांना पर्यायी शब्द आहेत. मात्र, आजकाल काही लोक याच्या अगदी उलट करण्याच्या प्रयत्नात आहेत. गांधी नव्हे, तर आरएसएस हे भारताचे प्रतीक व्हावे अशी काही लोकांची इच्छा आहे, असे म्हणत त्यांनी आरएसएसवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, गांधीजींच्या १५०व्या जयंतीचा उत्साह देशभरात पहायला मिळत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी राजघाट वर जाऊन गांधीजींना आदरांजली वाहिली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांना आदरांजली वाहिली.'
हेही वाचा : गांधी जयंतीनिमित्त ठाण्यात चिमुकले गांधी दिसले रस्त्यावर