बैतूल - मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात तावा नदीच्या पुलावरून लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक खाली कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच मजूर होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्रीच्या वेळी घोडाडोंगरी तालुक्यातील चोपना पोलीस स्टेशन परिसरातील तवा पुलावरून लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक खाली कोसळला. ट्रकच्या खाली आल्यामुळे सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच मजूर आणि ट्रक चालकाचा समावेश आहे. माहिती मिळताच चोपना पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या मदतीने ट्रकच्या खाली सापडलेले मृतदेह बाजूला काढण्यात आले.
हेही वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या 10 जणांना वाचवले, 'या' जिल्ह्यांत हिमस्खलनाचा इशारा
चोपना पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल रघुवंशी यांनी सांगितले की, सळ्यांनी भरलेला ट्रक मुलताईचा होता आणि त्यावरील मजूर पीपरी येथील रहिवासी होते. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे. अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - दिल्लीत हिवाळ्याला सुरुवात, पारा 3 ते 4 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, यांना मदत दिली जाईल, असेही म्हटले आहे.