ETV Bharat / bharat

आता कोरोनाही कमलनाथांचे सरकार वाचवू शकणार नाही - शिवराजसिंह चौहान

कमलनाथ सरकारला तुर्तास दिलासा मिळाला आहे. २६ मार्चपर्यंत मध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. कमलनाथ हे मैदान सोडून पळत असल्याचे चौहान म्हणाले. आता कोरोनाही त्यांना वाचवू शकणार नसल्याचे शिवराजसिंह चौहान म्हणाले.

shivrajsingh chaohan comment on Kamalnath
शिवराजसिंह चौहान
author img

By

Published : Mar 16, 2020, 2:04 PM IST

भोपाळ - कमलनाथ सरकारला तुर्तास दिलासा मिळाला आहे. २६ मार्चपर्यंत मध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. मात्र, हा निर्णय भाजपला मान्य नसून, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन ४८ तासात बहुमत चाचणी करण्याची मागणी केली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला असून, ते मैदान सोडून पळत असल्याचे म्हटले आहे. आता कोरोनाही यांना वाचवू शकणार नसल्याचे शिवराजसिंह चौहान म्हणाले.

  • BJP leader Shivraj Singh Chouhan: The Chief Minister is running away from the trust vote as he knows that the govt lacks majority. BJP has the majority&we've appealed the Governor to order conduct floor test at the earliest. He has assured us to protect our constitutional rights. pic.twitter.com/laW1ajZRRR

    — ANI (@ANI) March 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांच्यासह भाजपच्या आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन देऊन बहुमत असल्याचे राज्यपालांना सांगितल्याची माहिती शिवराजसिंह चौहान यांनी दिली. काँग्रेसकडे केवळ ९२ आमदार आहेत. आमच्याकडे १०७ आमदार असल्याचे ते म्हणाले. तसेच अल्पमतात असणाऱ्या सरकारला निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे चौहान म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.