ETV Bharat / bharat

सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणारी सर्वात तरुण भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे? जाणून घ्या - India women's national cricket team

हरियाणाच्या रोहतक येथील शेफाली वर्मा ही क्रिकेटमधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. ती कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

शेफाली वर्मा सर्वात तरुण भारतीय महिला क्रिकेटपटू

author img

By

Published : Sep 24, 2020, 6:03 AM IST

रोहतक : 'क्रिकेट हा फक्त मुलांचा खेळ आहे', या ओळी आपण अनेकदा ऐकल्या असतील पण, भारतीय महिला क्रिकेट टीममध्ये असणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीमुळे या ओळी फिक्या पडायला लागल्या आहेत. यातीलच एक धडाकेबाज क्रिकेटर म्हणून पुढे आलेलं नाव म्हणजे 'शेफाली वर्मा'. शेफालीने अवघ्या 15व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकलं. तिच्या खेळाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील 'फॅन' आहेत.

शेफाली वर्मा सर्वात तरुण भारतीय महिला क्रिकेटपटू

शेफालीचा क्रिकेटर बनण्याचा प्रवास हा अत्यंत खडतर होता. एका पुरुषप्रधान समाजात स्वत:ला सिद्ध करणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. पण जिद्दीच्या जोरावर तिनं हे साध्य केलं. हरियाणासारख्या राज्यात आजही मुलींना कमी लेखलं जात. तिच्या गावाजवळील परिसरात मुलं क्रिकेटचा सराव करायला अकॅडमीत जायची परंतु, मुलींसाठी अशी अकॅडमी नव्हतीच. त्यामुळे, शेफालीच्या वडिलांनी तिचे केस कापून तिला अकॅडमीत प्रवेश मिळवून दिला आणि शेफाली मुलगा बनून क्रिकेटच्या सरावासाठी जाऊ लागली.

शेफालीच्या वडिलांनाही क्रिकेटचे वेड आहे. त्यांनी तिला मुलांच्या अकॅडमीत सरावासाठी टाकलं, तेव्हा आसपासच्या लोकांनी त्यांना टोमणे मारणे सुरू केले. ती मुलगी आहे तिला बाहेर पाठवू नका, असे सल्लेही दिले. मात्र, शेफालीच्या वडिलांनी तिची आवड जपली आणि शेफालीनं आपल्या मेहनतीचं सोनं करून दाखवलं. तिची अवघ्या 15व्या वर्षी भारतीय क्रिकेट टीममध्ये निवड करण्यात आली.

शेफालीने सचिन तेंडुलकरचा मोडला आहे विक्रम –

15 वर्षीय शेफालीने 9 नोव्हेंबर 2019ला वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यातही अर्धशतकी खेळी केली होती. हे तिचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक होते. त्यामुळे ती भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारी सर्वात युवा क्रिकेटपटू ठरली होती. हा विक्रम करताना तिने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा 30 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. शेफालीने हा विक्रम केला, तेव्हा तिचे वय 15 वर्षे 285 दिवस इतके होते. तर, 30 वर्षांपूर्वी 16 वर्षे 214 दिवस एवढे वय असताना सचिनने 24 ऑक्टोबर 1989ला पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे पहिले अर्धशतक केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.