ETV Bharat / bharat

'कोव्हॅक्सिन'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी सिरम इन्स्टिट्यूट सज्ज!

ससून रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या चाचणीसाठी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू आहे. "यासाठी ज्यांना नाव नोंदणी करायची आहे, त्यांनी पुढील नंबरवर संपर्क साधावा - 8550960196, 8104201267" असे आवाहन रुग्णालयामार्फत करण्यात येत आहे.

Serum Institute all set to begin phase 3 trials of Covid-19 vaccine
'कोव्हॅक्सिन'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी सिरम इन्स्टिट्यूट सज्ज!
author img

By

Published : Sep 20, 2020, 6:49 AM IST

Updated : Sep 20, 2020, 3:44 PM IST

पुणे : ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‌ॅस्ट्राझेनेका यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या कोरोनावरील लसीची चाचणी भारतात सिरम इन्स्टिट्यूटद्वारे करण्यात येत आहे. या लसीच्या पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्या पार पडल्या असून, आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पुण्याच्या ससून रुग्णालयातून सुरू करण्यात येणार आहे. शनिवारी याबाबत माहिती देण्यात आली.

ससून रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या चाचणीसाठी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू आहे. "यासाठी ज्यांना नाव नोंदणी करायची आहे, त्यांनी पुढील नंबरवर संपर्क साधावा - 8550960196, 8104201267" असे आवाहन रुग्णालयामार्फत करण्यात येत आहे.

यापूर्वी इंग्लंडमध्ये एका स्वंयसेवकाची तब्येत बिघडल्यामुळे जगभरातील कोव्हॅक्सिनच्या चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या. अ‌ॅस्ट्राझेनेकाने या चाचण्या थांबवल्यामुळे सिरमनेही देशातील चाचण्या थांबवल्या होत्या. त्यानंतर १६ सप्टेंबरला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)ने सिरमला देशातीत चाचण्या पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली होती.

हेही वाचा : चीनला गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी दिल्लीतील पत्रकारास अटक

Last Updated : Sep 20, 2020, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.