जयपूर - राजस्थानमध्ये सध्या राजकीय सत्ता संघर्ष सुरू आहे. गेहलोत सरकार सध्या अडचणीत आले आहे. त्यातच सचिन पायलट आज रात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर त्याच्या भाजप प्रवेशाचे चित्र स्पष्ट होऊ शकते. मात्र, भाजपकडून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत अद्याप कोणतेहा दुजोरा समोर आलेला नाही. तर दुसरीकडे राजस्थानमध्ये आयकर विभागाची छापेमारी सुरू झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार सचिन पायलट तिसरा गट स्थापन करणार असतील तर त्यांना ३० आमदारांचा पाठिंबा मिळेल. परंतु ते भाजप सोबत जाणार असतील तर त्यांच्यासोबत केवळ १८ आमदार भाजपमध्ये जाण्यास तयार आहेत.
काँग्रेसचे ते १८ आमदार आजपर्यंत एकदाही मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निवासस्थानी आले नाहीत. त्यामध्ये राकेश पारीक, मुरारी लाल मीणा, जीआर खटाना, इंद्राज गुर्जर, गजेंद्र सिंह शक्तावत, हरीश मीणा, दीपेंद्र सिंह शेखावत, भंवर लाल शर्मा, इंदिरा मीणा, विजेंद्र ओला, हेमाराम चौधरी, पीआर मीणा, रमेश मीणा, विश्वेंद्र सिंह, जाहिदा, रामनिवास गावड़िया, मुकेश भाकर, सुरेश मोदी यांच्या नावांचा समावेश आहे..
सोमवारी ११ वाजता काँग्रेस आमदरांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या बैठकीला उपस्थित राहण्यास पायलट यांनी नकार दिला आहे. गेहलोत सरकार आता अल्पमतात असल्याचा दावा पायलट यांनी केला आहे.
- काँग्रसेची पत्रकार परिषद सुरू
- काँग्रेसच्या सर्व आमदारांना व सचिन पायलटला काँग्रेसकडून चर्चेसाठी दारे खुली -
- सर्व आमदारांनी पक्षाच्या बैठकीला उपस्थिती लावावी
- यावेळी सुरजेवाला यांनी आयकर विभागाच्या छापेमारीवरून भाजप सरकारवरही टीका केली
- मोदी, शाह यांना पैशाच्या बळावर आमदार खरेदी करता आले नाही, म्हणून आता ईडी, आयकरचा वापर सुरू आहे
- काँग्रेसची अतंर्गत माहिती आम्ही माध्यमापुढे देणे आवश्यक नाही.
- पीसीसी कार्यालयातून सचिन पायलट यांचे पोस्टर हटवण्यात आले.
- पायलट समर्थक आमदार ही बैठकीला उपस्थित
- काही आमदारांना पोलीस सुरक्षेत बैठकस्थळी आणण्यात आले.
- काँग्रेसचे वरिष्ठ नेते महेंद्र चौधरी आणि मंत्री हरीश चौधरी हे बैठकस्थळी पोहोचले
- कोणी एक आमदार गेल्याने सरकार अल्पमतात येत नाही- महेंद्र चौधरी
- मुख्यमंत्री गेहलोत यांच्या नेतृत्वातील राजस्थान सरकार 5 वर्ष पूर्ण करेल
- राजस्व मंत्री हरीश चौधरी म्हणाले की राजस्थानमध्ये 100 % काँग्रेसची सत्ता राहिल
सिंधिया-पायलट यांच्यामध्ये चर्चा
- सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यामध्ये 40 मिनट चर्चा
- सिंधिया यांनी रविवारी ट्वीट करून सीएम गेहलोत यांच्यावर निशाणा साधला होता
- आता सिंधिया-पायलट यांच्या चर्चेनंतर अनेक कयास लावले जात आहेत
काँग्रेस आमदारांची बैठक सुरू
- मुख्यमंत्री गेहलोत यांनी बोलावल्या काँग्रेसच्या बैठकील काँग्रसच्या ९० हून अधिक आमदारांनी उपस्थिती लावली आहे.
- राज्यात संत्तासंघर्ष सुरू असतानाच आता आयकर विभागाने राजकीय नेत्यांच्या घरावर छापेमारी करायला सुरुवात केली आहे. त्यांनी तब्बल २२ ठिकाणांवर छापेमारी केली आहे.
- राजस्थानमध्ये आयकर विभागाची छापेमारी