नवी दिल्ली - राज्यसभेच्या अधिवेशनाला २० जूनपासून सुरुवात होणार आहे. तर, लोकसभेचे अधिवेशन १७ जूनला आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही सदनाला २० जूनला संबोधित करणार आहेत.
राज्यसभेच्या सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभा २६ जुलैपर्यंत चालू राहणार आहे. या सत्रात सदनाच्या एकूण २७ बैठका होणार आहेत. लोकसभेचे अधिवेशन १७ जूनपासून सुरू होणार आहे. तर, १८ तारखेला नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. लोकसभा सभापतींच्या निवडणुका १९ जून रोजी पार पडणार आहेत. यावर्षीचा अर्थसंकल्प ५ जुलै रोजी सादर करण्यात येणार आहे.