ETV Bharat / bharat

'दारूची दुकाने उघडली तर सरकारने पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न विसरावे'

author img

By

Published : May 11, 2020, 10:03 AM IST

तामिळनाडूतील सर्व सरकारी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले होते. त्यावर पुन्हा तामिळनाडु सरकारने उच्च सर्वोच्च न्यायालय निर्णयाला आव्हान दिले आहे. तर तामिळनाडूमध्ये मद्य विक्रीची दुकाने उघडण्यास प्रसिद्ध अभिनेते रंजनीकांत यांनी विरोध केला आहे.

rajinikanth on open liquor shop
rajinikanth on open liquor shop

चैन्नई - तामिळनाडूमध्ये मद्य विक्रीची दुकाने उघडण्यास प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी विरोध केला आहे. 'जर सरकार दारूची दुकाने उघडणार असेल, तर पुन्हा सत्तेमध्ये येण्याचे स्वप्न विसरावे', अशी टीका रजनीकांत यांनी तामिळनाडू सरकारवर केली आहे.

तामिळनाडूतील सर्व सरकारी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले होते. त्यावर पुन्हा तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान मद्रास न्यायालयाने दारूच्या ऑनलाइन विक्रीवर सूट दिली आहे.

दारू खरेदी करताना न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. याचा परिणाम म्हणून, कमल हासन यांच्या मक्कल निधी मय्यमने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले होते.

कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये दारूची दुकाने उघडली गेली आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागातील लोक सिमा उल्लंघन करून दारू आण्याचा प्रयत्न करत होते. अशा घटना समोर आल्यानंतर राज्यात दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तामिळनाडू सरकारने सांगितले होते. तर सरकारच्या दारूची दुकाने उघडण्याच्या निर्णयावर राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.