नवी दिल्ली - सध्या सुरू असलेल्या विशेष रेल्वेंच्या आरक्षणासाठीचा कालावधी (अॅडव्हान्स रिजर्वेशन पीरिएड) वाढवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यासोबतच, १ जूनपासून सुरू होणाऱ्या आणखी १०० विशेष रेल्वेंनासुद्धा हा नियम लागू होणार आहे. सध्या प्रवाशांना ३० दिवस आधीपर्यंत तिकिटाचे आरक्षण करता येते. यानंतर आता १२० दिवस आधीपर्यंत तिकिटाचे आरक्षण करता येणार आहे.
एआरपी वाढवण्यासोबतच, पार्सल आणि सामानाचे बुकींगही करता येणार असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. तसेच, इतर प्रकारचे बुकींग जसेकी तात्काळ कोटा, करंट बुकींग यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, ते नेहमीप्रमाणेच सुरू असणार असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
३१ मे रोजी सकाळी आठ वाजल्यापासून हे नियम लागू होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.
हेही वाचा : दिलासादायक बातमी..! एका महिन्यात सर्व मुंबईकरांची चाचणी घेऊ शकणारी लॅब लवकरच सेवेत