नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये काही दिवसांपूर्वी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या पीडितेचा मृत्यू झाला. हाथरसमध्ये आरोपींनी पिडीतेवर अत्याचार केला आणि नंतर तिची हत्या केली असा आरोप करत, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ ट्विट केलाय. या व्हिडीओच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी जनतेला समाज व्यवस्थेमध्ये बदल घडून आणण्याचे आवाहन केले आहे.
-
यह वीडियो उनके लिए है जो सच्चाई से भाग रहे हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
हम बदलेंगे, देश बदलेगा। pic.twitter.com/pbe0qJSGFr
">यह वीडियो उनके लिए है जो सच्चाई से भाग रहे हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 13, 2020
हम बदलेंगे, देश बदलेगा। pic.twitter.com/pbe0qJSGFrयह वीडियो उनके लिए है जो सच्चाई से भाग रहे हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 13, 2020
हम बदलेंगे, देश बदलेगा। pic.twitter.com/pbe0qJSGFr
उत्तर प्रदेशच्या हथरसमध्ये या व्हिडीओचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये जातीय उतरंड, जातीवर आधारित समाजाचे बदलत जाणारे व्यवहार आणि काही जातींना जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. हा व्हिडीओ ट्विट करत राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, "हा व्हिडीओ त्यांच्यासाठी आहे, जे सत्यापासून दूर पळत आहेत. जेव्हा आपण बदलू, तेव्हा देश बदलेल.
दरम्यान, हाथरस घटनेप्रकरणी पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती अॅडिश्नल अॅडव्होकेट जनरल व्ही के शाही यांनी सांगितले.