ETV Bharat / bharat

चिन्मयानंद खटला: प्रियांका गांधी पदयात्रेतून पीडित विद्यार्थिनीला देणार पाठिंबा - swami chinmayanand

महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या सचिव प्रियंका गांधींनी लखनऊमध्ये पदयात्रेचे आयोजन केले आहे. या पदयात्रेद्वारे त्या स्वामी चिन्मयानंद खटल्यातील पिडितेला पाठिंबा दर्शवणार आहे.

प्रियंका गांधी
author img

By

Published : Oct 2, 2019, 12:34 PM IST

लखनौ- महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या सचिव प्रियांका गांधींनी लखनौमध्ये पदयात्रेचे आयोजन केले आहे. या पदयात्रेद्वारे त्या स्वामी चिन्मयानंद खटल्यातील पीडितेला पाठिंबा दर्शवणार आहे. याआधी प्रियांका गांधींना पीडितेच्या पाठिंब्यासाठी रॅली काढण्यास प्रशासनाने परवानगी नाकाराली होती.

  • जैसे पता चलता है कि उनके ख़िलाफ प्रदर्शन होने जा रहा है 144 लगा देते हैं।

    जनता की आवाज को दबाया नहीं जा सकता, अन्याय-अत्याचार को छिपाया नहीं जा सकता। जितनी कोशिश करेंगे, उतनी ही न्याय की माँग बुलंद होती जाएगी। शाहजहाँपुर की लड़की को न्याय दीजिए। अपने मंत्री को बचाना बंद कीजिए।

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लखनौ शहरातील शहीद स्मारकापासून जीपीओ पार्कपर्यंत ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. जीपीओ पार्क येथे दुपारी प्रियंका गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधीना श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर गांधी लखनौमधील पक्षाच्या कार्यालयात बैठक घेणार आहेत.

चिन्मयानंद यांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी उत्तरप्रदेश सरकारवर केला आहे. विधी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पीडित तरुणीच्या समर्थनार्थ काल (मंगळवारी) रॅली काढण्यापासून प्रशासनाने काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखले, यावरुनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. उत्तरप्रदेश सरकार पीडितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्या म्हणाल्या.

आज महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून त्या पीडितेच्या समर्थनार्थ उतरणार आहेत. भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर एका महाविद्यालयीन तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी चिन्मयानंद यांच्यावर गुन्हा देखील दाखल आहे. मात्र, मागील आठवड्यात पोलिसांनी खंडणी मागितल्याच्या आरोपावरुन पीडितेलाच अटक केली आहे. त्यावरुन प्रियांका गांधी यांनी उत्तरप्रदेश सरकार आणि पोलिसांवर कडाडून टीका केली आहे.

Intro:Body:

nat 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.