नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्काराने सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. १९ वर्षीय दलित तरुणी शेतात गेली असता चार सवर्ण तरुणांनी तिच्यावर अत्याचार केले होता. तसेच तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला होता. काल (मंगळवार) दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर योगी आदित्यनाथ सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. काँग्रेस नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना काही प्रश्न विचारले आहेत.
-
मैं यूपी के मुख्यमंत्री जी से कुछ सवाल पूछना चाहती हूँ-
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
परिजनों से जबरदस्ती छीन कर पीड़िता के शव को जलवा देने का आदेश किसने दिया?
पिछले 14 दिन से कहां सोए हुए थे आप? क्यों हरकत में नहीं आए?
और कब तक चलेगा ये सब? कैसे मुख्यमंत्री हैं आप? pic.twitter.com/Q2qPcDXDTT
">मैं यूपी के मुख्यमंत्री जी से कुछ सवाल पूछना चाहती हूँ-
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 30, 2020
परिजनों से जबरदस्ती छीन कर पीड़िता के शव को जलवा देने का आदेश किसने दिया?
पिछले 14 दिन से कहां सोए हुए थे आप? क्यों हरकत में नहीं आए?
और कब तक चलेगा ये सब? कैसे मुख्यमंत्री हैं आप? pic.twitter.com/Q2qPcDXDTTमैं यूपी के मुख्यमंत्री जी से कुछ सवाल पूछना चाहती हूँ-
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 30, 2020
परिजनों से जबरदस्ती छीन कर पीड़िता के शव को जलवा देने का आदेश किसने दिया?
पिछले 14 दिन से कहां सोए हुए थे आप? क्यों हरकत में नहीं आए?
और कब तक चलेगा ये सब? कैसे मुख्यमंत्री हैं आप? pic.twitter.com/Q2qPcDXDTT
प्रियंका गांधी यांनी एक ट्विट करून योगी आदित्यनाथ यांना बलात्काराच्या घटनेवरून प्रश्न केले आहेत. 'मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काही प्रश्न विचारू इच्छिते, कुटुंबियांकडून मृतदेह हिसकावून घेत जाळण्याचा आदेश कोणी दिला? मागील १४ दिवसांपासून तुम्ही झोपले होता काय? तेव्हा का काही कारवाई केली नाही? हे असे कधीपर्यंत चालणार? तुम्ही कसले मुख्यमंत्री आहात, अशा प्रश्नांची सरबत्ती प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केली.
१९ वर्षीय पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पहाटे ३ वाजता पोलिसांनी कुटुंबीयांना घरात डांबून अंत्यसंस्कार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पोलिसही टीकेचे धनी बनले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. आम्हाला मुलीचा शेवटी चेहराही पाहता आला नाही. पोलिसांनी बळजबरीने अंत्यसस्कार केले, असा आरोप बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या पीडित दलित तरुणीवर बलात्कार केल्यानंतर चौघांनी तिची जीभ कापून टाकली, तर मानेवर वार केले. तरुणीच्या मणक्यालाही गंभीर इजा पोहचली होती. घटनेनंतर पीडितेला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान काल तिचा मृत्यू झाला.