पाटना - बिहारमध्ये लॉकडाऊनमुळे नागरिक घरात बसून त्रस्त झाले आहेत. मात्र, हा लॉकडाऊन पटना शहरासाठी नवसंजीवनी देणारा ठरला आहे. मागील काही दिवसात शहरातील प्रदुषणात कमालीची घट झाली असून वातावरण शुद्ध झाले आहे. त्यामुळे कोरोनानंतरही आठवड्यातील दोन दिवस लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी पटना शहरातील प्रदूषण प्रचंड वाढले होते. देशातील सर्वात जास्त प्रदुषित शहरांच्या यादीत पटन्याचा समावेश झाला होता. मात्र, आता लॉकडाऊनमुळे प्रदूषण कमी होऊन वातावरण स्वच्छ झाले आहे. डेंजर झोनमधून बाहेर पडून हवेची गुणवत्ता सामान्य झाली आहे.
मागच्यावर्षी डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत प्रदूषणाची पातळी ५०० पर्यंत पोहचली होती. मात्र, आता लॉकडाऊन झाल्यानंतर हीच पातळी १२० पर्यंत खाली आली आहे. दिवाळीच्या कालावधीत बिहारमध्ये प्रदूषणाची पातळी वाढते.
१६ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत विविध शहरातील हवेचा एयर क्वालिटी इंडेक्स -
Date | Patna | gaya | muzaffarpur |
16 | 138 | 117 | 94 |
17 | 167 | 76 | 95 |
18 | 164 | 57 | 109 |
19 | 170 | 89 | |
20 | 134 | 88 | |
21 | 239 | 158 | 228 |
22 | 122 | 119 | 107 |
23 | 112 | 126 | 241 |
24 | 112 | 144 | 250 |
25 | 96 | 136 | 273 |
26 | 112 | 75 | 275 |
27 | 49 | 81 | 80 |
28 | 54 | 88 | 256 |
29 | 56 | 111 | 176 |
30 | 56 | 114 | 153 |
31 | 80 | 144 |
प्रदूषणामुळे झालेले मृत्यू -
बिहारमधील गया आणि मुजफ्फरपूर या दोन शहरांत २००० ते १०१७ या कालावधील प्रदूषणामुळे ७१० मृत्यू झाले आहेत. एनव्हायर्रमेंट अँड एनर्जी डेव्हलपमेंट या संस्थेच्या माहितीनुसार २०१७ या एका वर्षात बिहार राज्यात प्रदूषणामुळे 91 हजार 458 लोकांचा मृत्यू झाला. यात 14 हजार 929 बालकांचा समावेश आहे.