राजस्ठान - दिल्लीत इस्लाममधील मरकझ समुहाच्या पार पडलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या काहींनी अलवर जिल्ह्यामार्गे राजस्थानमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यानंतर जिल्हा पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले असून यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकझ या धार्मिक कार्यक्रमासाठी तबलिगी समुदायातील अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमादरम्यान कोरोनाचा प्रसार झाला. तसेच तेलंगणात यामुळे मृत्यू झाल्याचे देखील समोर आले आहे. दिल्लीतील कार्यक्रमात हजेरी लावलेल्यांवर सर्व राज्यात पाळत ठेवण्यात येत आहे. अनेकांचा शोध देखील सुरू आहे. तसेच काहींना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले.
राज्यांच्या सीमांवरील बंदोबस्त आणखी कडक करण्यात आलाय. यानंतर अलवर जिल्ह्याच्या सीमेवर दोन चारचाकींमधील दहा जणांना राजस्थानमध्ये प्रवेश करताना पोलिसांनी पकडले. पकडलेल्या व्यक्तींनी हरियाणा प्रशासनाची परवानगी असल्याचे सांगून त्यांनी आंध्र पदेशात जाण्याची मागणी केली.
संबंधितांकडे ३० मार्च ते ७ एप्रिल पर्यंत हरियाणा प्रशासनाची परवानगी होती. मात्र, राजस्थानची सीमा सील करण्यात आल्याने नौगवा चेक पोस्टवर त्यांना आडवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या व्यक्तींची गाडी काही काळ दोन्ही राज्यांच्या सीमेवर फिरत होती. यानंतर ते हरियाणात परतणार होते. मात्र, अलवर पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना राजस्ठानमध्ये घुसण्यापासून रोखण्यात आले.
अलवर जिल्ह्यात मेवात नामक क्षेत्र येते. हा परिसर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध आहे. या परिसरातील अनेक छोटे कच्चे रस्ते विविध गावांमधून दोन्ही राज्यांना मिळतात. यामुळे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात पोलीस चेक पोस्ट लावण्याची आवश्यकता आहे. संबंधित प्रकणात अनेक पुरावे आणि महत्वाची माहिती प्राप्त झाली असून यानुसार तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.